UPSC IES Prelims 2021: यूपीएससी आयईएस पूर्व परीक्षेची तारीख जाहीर

Exam Date, Pattern and Admit Card Update: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC)ने भारतीय इंजिनीअरिंग सर्विस पूर्व परीक्षेचे (UPSC IES Prelims 2021) शेड्यूल घोषित केले आहे. भारतीय इंजिनीअरिंग सेवा पूर्व परीक्षेसाठी उपस्थित होणारे उमेदवार UPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक तपासू शकतात आणि येथूनच ते डाऊनलोडही करता येईल. अधिकृत वेबसाइट upsc.gov.in ही आहे. यूपीएससी द्वारे भारतीय इंजिनीअरिंग सर्विसेस् ची पूर्व परीक्षा १८ जुलै २०२१ रोजी आयोजित केली जाणार आहे. UPSC IES Prelims 2021 परीक्षेत बसण्यासाठी सुमारे २ ते ३ लाख उमेदवारांनी नोंदणी केली आहे. देशभरात १५ परीक्षा केंद्रांवर आयोगाद्वारे ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे. यूपीएससी एक्झाम 2021 नोटिफिकेशनची थेट लिंक या वृत्तात पुढे देण्यात आली आहे. दोन सत्रात होणार पेपर यूपीएससी आयईएस प्रिलिम्स परीक्षा 2021 चे आयोजन १८ जुलै रोजी दोन सत्रात होईल. पहिले सत्र सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत तर दुसरे सत्र दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत असेल. या परीक्षेत दोन पेपर असणार आहे. पहिल्या सत्रात सामान्य अध्ययन आणि इंजिनीअरिंग अॅप्टिट्यूड पेपर (पेपर -1) असेल, तर दुसऱ्या सत्रात सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम इंजिनीअरिंगचा पेपर (पेपर-2) आयोजित केला जाईल. परीक्षा पॅटर्न आणि अॅडमिट कार्ड पेपर-1 साठी दोन तासांचा अवधी असेल. यात एकूण २०० प्रश्न असतील. पेपर २ हा २०० गुणांचा असेल आणि त्यासाठी तीन तासांचा कालावधी दिला जाईल. दोन्ही पेपर वस्तुनिष्ठ प्रकारचे असतील. आयोग परीक्षेसाठी लवकरच UPSC IES Prelims 2021 Admit Card आपल्या अधिकृत वेबसाइट वर जारी करेल. वेळापत्रक कसे डाऊनलोड करावे? यूनियन पब्लिक सर्विस कमिशन (UPSC)च्या अधिकृत वेबसाइटच्या होम पेज वर व्हॉट्स न्यू सेक्शन मध्ये जा. तेथे Examination Time Table: Engineering Services (Preliminary) Examination, 2021 लिंक वर क्लिक करा. नवे पेज उघडेल, येथे टाइम टेबलच्या डाऊनलोड लिंक वर क्लिक करा. एक्झाम शेड्युलची पीडीएफ कॉपी उघडेल. ती डाऊनलोड करा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xoEOIb
via IFTTT

Post a Comment

0 Comments