MPSCच्या जाहीरातीत वयोमर्यादा वाढवून द्या, विद्यार्थ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Exams : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC)घेण्यात येणाऱ्या परीक्षांसंदर्भात आता नवा वाद उद्भवला आहे. यामुळे राज्यातील देणारे विद्यार्थी पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. गेल्या दीड वर्षांपासून एमपीएससी परीक्षांची जाहिरात (MPSC Exam Advertisement) काढण्यात आली नव्हती. यामुळे परीक्षा देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपुष्टात आली आहे. राज्यातील कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षापासून MPSC परीक्षेची जाहिरात काढण्यात आलेली नाही. या कारणामुळे एमपीएससी देणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपुष्टात आली आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे एक वर्ष वय वाढवणार असा शब्द राज्य सरकारने दिला होता. आता एमपीएससीची जाहीरात करण्यासोबत विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेत देखील वाढ करावी अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी एमपीएससीचे विद्यार्थी आक्रमक होण्याची शक्यता आहे. आता राज्य सरकारने MPSC परीक्षेची जाहिरात काढण्याबरोबरच वयोमर्यादेतही वाढ करावी या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना (CM Uddhav Thackeray) पत्र देखील लिहिले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wSeTrV
via IFTTT

Post a Comment

0 Comments