Also visit www.atgnews.com
NAFED Assistant Manager Recruitment 2021 : असिस्टंट मॅनेजरची भरती, २८ जूनपर्यंत करा अर्ज
Assistant Manager 2021 : नॅशनल एग्रीकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ( National Agricultural Cooperative Marketing Federation of India Ltd, NAFED) ने असिस्टंट मॅनेजर(Assistant Manager) पदांवर भरती काढली आहे. उमेदवार ऑनलाईन अर्जासाठी अधिकृत वेबसाईट vamnicom.gov.in वर जाऊ शकतात. यासाठी २८ जून २०२१ ही शेवटची तारीख आहे. ही तारीख निघून गेल्यावर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. NAFED तर्फए नोटिफिकेशननुसार नॅार्थमध्ये १ आणि वेस्टमध्ये १ पदांवर भरती होणार आहे. तर ईस्टमध्ये १ आणि साऊथ रिजनमध्ये २ पदांची नियुक्ती केली जाणार आहे. या पदावर ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी चार्टर्ड अकाऊटंट / आयसीडब्ल्यूए / बीकॉमसह एमबीए (फायनेंस) असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त संबंधित फील्डचा 3 वर्षांचा अनुभवही असणे गरजेचे आहे. या पोस्टवर ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३५ वर्षांपेक्षा अधिक असू नये. तसेचआरक्षित वर्गाच्या उमेदवारांना सरकारी नियमानुसार सवलत दिली जाईल. इतका असेल पगार अकाऊंट्स पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराचा पगार ४७ हजार ६०० ते १ लाख ५१ हजार १०० इतका पगार (केंद्र सरकारच्या वेतनमान लेव्हल -८) दिला जाईल.यासंदर्भातील अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटवर मिळू शकते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3waR0vK
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments