Also visit www.atgnews.com
UPSC नागरी सेवा परीक्षांच्या मुलाखतींचे सुधारित वेळापत्रक जाहीर
2020: केंद्रीय लोक सेवा आयोगाने (Union Public Service Commission, UPSC) बुधवारी ९ जून २०२१ रोजी नागरी सेवा परीक्षा २०२१ साठी मुलाखतींच्या फेरीचे सुधारित वेळापत्रक जारी केले आहे. यूपीएससीने इंटरव्ह्यूचे वेळापत्रक आपले अधिकृत संकेतस्थळ वर जारी केले आहे. शेड्युलनुसार, यूपीएससी सिव्हिल सर्विस परीक्षेसाठी मुलाखती २ ऑगस्ट २०२१ पासून सुरू होणार आहेत. ही प्रक्रिया २२ सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. ज्या उमेदवारांनी UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२० यशस्वीपणे उत्तीर्ण केली आहे, ते UPSC CSE 2020 मुलाखतींना उपस्थित राहण्यास पात्र आहेत. या आहेत महत्त्वाच्या तारखा - मुलाखती सुरू होण्याची तारीख- २ ऑगस्ट २०२१, सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत मुलाखती संपण्याची तारीख - २२ सप्टेंबर २०२१, सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत IAS interview time table 2020: इंटरव्ह्यू शेड्युल असे करा डाऊनलोड मुलाखतींचं शेड्युल डाऊनलोड करण्यासाठी सर्वात आधी उमेदवारांनी यूपीएससीची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा. यानंतर UPSC CSE मुलाखत टाइमटेबल 2020-21 लिंक वर क्लिक करा. यानंतर यूपीएससी आयएएस मुलाखत वेळापत्रक पीडीएफ स्वरुपात स्क्रीन वर दिसेल. आता उमेदवारनिहाय यूपीएससी आयएएस मुलाखतीची तारीख आणि वेळ जाणून घेण्यासाठी CTRL+F चा उपयोग करून आपला रोल नंबर शोधा. भविष्यातील संदर्भासाठी ही पीडीएफ डाऊनलोडही करून ठेवता येईल. यूपीएससीने यासंबंधी एक नोटिफिकेशन जारी केले आहे. यानुसार, करोना व्हायरस मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आयोगाने नागरी सेवा परीक्षा २०२० ची मुलाखत प्रक्रिया २ ऑगस्ट पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारांना मुलाखतींची पत्र लवकरच पाठवली जातील. उमदेवार अधिकृत वेबसाइट https://www.upsc.gov.in आणि https://ift.tt/2Nsxd6Z च्या माध्यमातून डाऊनलोड करू शकतात. यापूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा २०२० च्या मुलाखती २६ एप्रिल ते १८ जून २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या. पण कोविड - १९ संक्रमण स्थितीमुळे ही मुलाखतींची फेरी लांबणीवर टाकण्यात आली होती. या परीक्षेसंबंधी अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3505RgG
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments