Also visit www.atgnews.com
Salary in Yoga:योगा प्रोफेशनल बनून चांगली कमाई करा,किती मिळतो पगार? जाणून घ्या
Salary:देशामध्ये वेगवेगळ्या योगा प्रोफेशनल्सना साधारणपणे किती कमाई असते ? हे लेख हे जाणून घेण्यासाठी आहे. हठ योग शिक्षक (Hath Yoga)- शास्त्रीय हठ योगामध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्याबद्दल अनेकांना माहिती नाही. योगा अभ्यास नेहमी व्यायामाच्या रुपात केला जातो. पण शास्त्रीय हठ योगमध्ये त्यापुढचे प्रशिक्षण दिले जाते. हठ योग शिक्षकांना सुरुवातीला ३० हजार रुपयांपासून ६० हजार रुपयांपर्यंत पगार मिळतो. याचे वर्कशॉप देखील असतात. हठ योग क्लासेसची फी प्रती सेशन १५०० ते ५ हजार रुपयांपर्यंत असते. योग प्रशिक्षक(() - योग प्रशिक्षक हेल्थ सेंटरसोबत काम करु शकतात. तसेच हे ट्रेनर म्हणून देखील काम करतात. एक योग शिक्षक व्यायामशाळा, रुग्णालय अशा ठिकाणी काम करु शकतो. योग शिक्षकाला सुरुवातीला ३० हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत पगार मिळतो. योग चिकित्सक (Yoga Therapist) - योग चिकित्सक बनून वेगवेगळ्या उपचारांनी शरीरातील दोष दूर करता येतात. आपल्या शरीरात असे बिंदू आहेत जे योग्य पद्धतीने दाबल्यास शरीरातील दुखणी दूर होतात. योग चिकिस्तकाचे सुरुवातीचे वेतन ४५ हजार असू शकते. योग शिक्षक (Yoga Teacher)- योगामध्ये प्रशिक्षित पदवीधर वेगवेगळ्या सरकारी आणि खासगी शाळांमध्ये शिकवण्याचा पर्याय निवडतात. आजकाल प्रत्येक शाळेत योगा क्लास असतात. योग शिक्षक हे विद्यार्थ्यांना राज्य स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचवण्यााठी प्रशिक्षित करतात. एका योगा शिक्षकाचा सुरुवातीचा पगार ३५ हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक असू शकतो.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3d54eCK
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments