SBI Jobs 2021:विना परीक्षा एसबीआयमध्ये नोकरीची संधी, SCO पदाची भरती;असा करा अर्ज

SBI SCO 2021, Bank : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)मध्ये नोकरी(Bank Job)मिळवण्याची संधी आहे. ज्या उमेदवारांनी आतापर्यंत एसबीआय स्पेशलिस्ट कॅडर अधिकारी (SBI SCO Recruitment 2021)आणि मॅनेजर पदासाठी अर्ज केला नसेल त्यांना आणखी एक संधी आहे. याची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १५ जूनपासून सुरु झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी एसबीआयची अधिकृत वेबसाइट www.sbi.co.in/ Careers वर जाऊन ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे. या पदांवर अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जून आहे. एसबीआय स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर आणि मॅनेजर भरती नोटिफिकेशनची थेट लिंक खाली देण्यात आली आहे. नोकरीचा तपशील (SBI Vacancy 2021 Details) या नोकरीअंतर्गत जाहिरातींची संख्या सीआरपीडी / एससीओ-फायर / २०२०-२१ / ३२ आणि सीआरपीडी / एससीओ / २०२१-२२ / ०६ अंतर्गत क्रमश: (इंजिनियर) (फायर) आणि मॅनेजर (नोकरी कुटुंब आणि उत्तराधिकारी योजना) समाविष्ट आहेत. इंजिनियर (फायर) आणि मॅनेजरच्या पदांच्या एकूण १६ जागा रिक्त आहेत. डिसेंबर २०२० मध्ये सुरु झाले अर्ज रेग्यूलर बेसिसवर स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरला भरतीसाठी डिसेंबर २०२० मध्ये अर्ज मागविण्यात आले होते. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ११ जानेवारी २०२१ पर्यंत होती. अधिकृत नोटिसनुसार ज्या उमेदवारांनी अर्ज भरला होता त्यांना पुन्हा अर्ज भरण्याची गरज नाही. कोण करू शकेल अर्ज ? इंजीनियरियन फायर: यूजीसीकडून मान्यताप्राप्त विद्यापीठ / एआईसीटी द्वारे अनुक्रमित संस्थानातून नॅशनल फायर सर्व्हीस कॉलेज (एनएफएससी), नागपुरमध्ये बीई (फायर) या बी.टेक (सेफ्टी एंड फायर इंजीनियरिंग) / बी.टेक (फायर टेक्नोलॉजी अॅण्ड सेफ्टी इंजीनियरिंग) / बी.एससी (फायर) असणे आवश्यक आहे. किंवा इंस्टीट्यूट ऑफ फायर इंजीनियर्स (भारत / यूके) तून पदवी, नॅशनल फायर सर्व्हीस कॉलेज (एनएफएससी), नागपूरहून डिव्हीजनल ऑफिसर्स कोर्समध्ये पदवी असणे गरजेचे आहे. मॅनेजर: कोणत्याही शाखेतील पदवी आणि एमबीए / पीजीडीएम. त्याव्यतिरिक्त, मानव संसाधन क्षेत्रामध्ये विशिष्ट प्रमाणपत्रे असणे गरजेचे आहे. बँकर्स / एनबीएफसी (१ फेब्रुवारी २०२१ पर्यंत) मानव संसाधन क्षेत्रात कमीतकमी ७ वर्षांचा अनुभव (इंटर्नशिप सहित) असणे गरजेचे आहे. असा करा अर्ज उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ https://ift.tt/2u79DFM किंवा https://ift.tt/2ZLiVmT वर जाऊन स्वत:ची नोंदणी करणे गरजेचे आहे. तसेच उमेदवारांना ऑनलाईन अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. निवड प्रक्रिया योग्य उमेदवारांची निवड प्रत्यक्ष मुलाखतीच्या आधारे होईल. शॉर्टलिस्टिंग, शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाच्या आधारे योग्य उमेदवारास मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखत शंभर गुणांची असेल. निवडण्याचा अधिकार बॅंकेकडे असेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3gmnLAJ
via IFTTT

Post a Comment

0 Comments