Also visit www.atgnews.com
Spices Board Recruitment 2021:मुंबईसह इतर शहरातील लॅबमध्ये पदांची भरती, ईमेलवरून करा अर्ज
: स्पाईसेस बोर्डमध्ये सरकारी नोकरीची वाट पाहत असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारत सरकारच्या कॉमर्स आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या स्पाइस बोर्ड भारतने मुंबईसह, रायबरेली (उत्तर प्रदेश), कोलकाता, आणि चेन्नईतील मुल्यांकन प्रयोगशाळेत भरती काढली आहे. क्वालिटी एनालिस्ट आणि ट्रेनीची एकूण १२ पदे भरली जाणार आहेत. यासाठी जाहीरात देखील देण्यात आली आहे. मंडळाद्वारे २४ मे आणि २५ मे रोजी वेगवेगळ्या जाहिराती देण्यात आल्या. यानुसार पात्र उमेदवारांनी ईमेलवर अर्ज करणे अपेक्षित आहे. स्पाइसेस बोर्डवरील पदांसाठी भरती ही ठराविक कालावधीसाठी असणार आहे, याकडे उमेदवारांनी लक्ष द्यायला हवे. आणि हा कालावधी दोन वर्षांचा असणार आहे. स्पाईस बोर्डने टेक्निकल एनालिस्ट पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना अधिकृत वेबसाइट indianspices.com वर भेट देण्यास सांगितले आहे. यातील करिअर सेक्शनमध्ये जाऊन किंवा बातमी खाली दिलेल्या लिंकवर थेट जाऊन जाहीरात मिळू शकते. अर्जाचा फॉर्म जाहीरातीतच दिला गेला आहे. हा फॉर्म पूर्ण भरुन आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन कॉपीसह संबंधित क्षेत्रासाठी दिल्या गेलेल्या ईमेलवर पाठवावा लागेल. यासाठी १८ जून २०२१ पर्यंत ईमेल करणे आवश्यक आहे. अशाप्रकारे प्रशिक्षणार्थी पदासाठी अधिकृत संकेतस्थळ किंवा बातमी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन अर्ज भरु शकता. हा फॉर्म पूर्ण भरुन महत्वाच्या कागदपत्रांसह दिलेल्या ईमेल आयडीवर पाठवायचा आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2RRLwHr
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments