TET 2021 Registration Postponed:'या'राज्यात नोंदणी स्थगित पण वेळेत होणार परीक्षा

: डायरेक्टरेट ऑफ एजुकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, मेघायने टीईटी २०२१ साठी नोंदणी स्थगित केली आहे. यासाठी १० जूनपासून नोंदणी प्रक्रिया सुरू होणार होती. कोरोना प्रादुर्भावामुळे टीईटी २०२१ ची नोंदणी प्रक्रिया स्थगित करण्यात आली. megeducation.gov.in च्या अधिकृत संकेतस्थळावर यांची माहिती देण्यात आली आहे. परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आता थोडी वाट पाहावी लागणार आहे. अधिकृत संकेतस्थळावर याची पुढील माहिती देण्यात येणार आहे. पण आतापर्यंत परीक्षेची तारीख बदलली नाही. या अधिकृत नोटिसमध्ये परीक्षेच्या तारखेसंदर्भात काही सांगितले नाही. ही परीक्षा २८ ऑगस्ट २०२१ रोजी होणार आहे. अशावेळी उमेदवार पुन्हा ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरु करु शकतात. सीबीएसईची दोन टप्प्यात परीक्षा सीबीएसईने आतापर्यंत जुलै महिन्यात होणाऱ्या सीटीईटी परीक्षेसाठी नोटिफिकेशन जाहीर केले नाही. या ३१ जानेवारीला परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी देशात करोनाची प्रकरणे खूपच कमी होती. दरवर्षी सीटीईटीची परीक्षा दोनवेळा आयोजित केली जाते. जानेवारी आणि जुलैमध्ये या परीक्षेचे आयोजन होते. जुलै २०२० मध्ये देशाव्यापी लॉकडाऊनमुळे सीटीईटीची परीक्षा होऊ शकली नाही. ती परीक्षा रिशेड्यूल्ड होऊन ३१ जानेवारी २०२१ रोजी होणार होती. सीबीएसई आता दोन टप्प्यात सीटीईटीची परीक्षा घेणार आहे. पहिली ते पाचवीपर्यंतच्या मुलांच्या शिकवण्यासाठी सीटीईटीचा पहिला पेपर देणे आवश्यक असते. तर सहावीपासून आठवीपर्यंतच्या मुलांना शिकवण्यााठी सीटीईटीचा दुसरा पेपर पास होणे गरजेचे आहे. कोणताही उमेदवार दोन्ही पेपर किंवा कोणत्याही एका पेपरची परीक्षा देऊ शकतो.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pT0kSG
via IFTTT

Post a Comment

0 Comments