Also visit www.atgnews.com
UPSC Admit Card 2021 Exam Date: युपीएससी IES,ISS चे प्रवेश पत्र जाहीर
2021 Exam Date:केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission or UPSC) ने भारतीय आर्थिक सेवा (IES) या भारतीय सांख्यिकी सेवा (ISS)परीक्षा २०२१ साठी प्रवेश पत्र ( ISS Admit Card 2021) जाहीर करण्यात आले आहे. ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी नोंदणी केली त्यांना यूपीएससीची अधधिकृत वेबसाईट upsc.gov.in वरुन आपले प्रवेश पत्र डाऊनलोड करता येईल. प्रवेश पत्रावर दिलेले निर्देश काळजीपूर्वक वाचा. यूपीएससी भरती परीक्षा २०२१ चे प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याची सोपी पद्धत खाली देण्यात आली आहे. उमेदवार, प्रवेश पत्रासह ओळख पत्रासाठी आपले आयकार्ड आणावे लागेल. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याची थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे. UPSC IES, Exam 2021 Admit Card: असे करा डाऊनलोड यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर जा होम पेजवर ‘e - Admit Card: Indian Statistical Service Examination, 2021 किंवा e - Admit Card: Indian Economic Service Examination, 2021’ IES/ISS 2021 डाउनलोड अॅडमिट कार्ड लिंक वर क्लिक करा. लॉग इन करण्यासाठी नोंदणी किंवा रोल नंबर आणि जन्म तारीख टाका प्रवेश पत्र स्क्रीनवर दिसेल डाउनलोड करा आणि प्रिंटआऊट काढून ठेवा यूपीएससी भरती परीक्षा २०२१ UPSC IES/ISS परीक्षा २०२१ ही १६,१७ आणि १८ जुलै २०२१ रोजी होणार आहे. परीक्षा दोन शिफ्टमध्ये होणार आहे. पहिली शिफ्ट सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत असेल तर दुसरी शिफ्ट दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत असेल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hoNvvy
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments