Also visit www.atgnews.com
आयआयटी मुंबईत विद्यार्थिनींना एमटेकसाठी प्रोत्साहन
म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : आयआयटी मुंबईमधून एमटेकच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना आर्थिक मदत उपलब्ध होणार आहे. यासाठी 'अॅन्सीस' या जागतिक पातळीवरील आघाडीच्या आणि इंजिनीअरिंग सिम्युलेशन सॉफ्टवेअरचा शोध लावणाऱ्या संस्थेने आयआयटी मुंबईशी सामंजस्य करार केला आहे. शिक्षण, आरोग्यसेवा, पर्यावरणाशी संबंधित विषयांवर संशोधन करणाऱ्या विद्यार्थिनींना याचा विशेष फायदा होणार आहे. अॅन्सीसचा सामाजिक दायित्व निधीतून आकारास येणारा हा उपक्रम आहे. उच्च गुणवत्ता धारण करणाऱ्या, पण गरीब पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थिनींना मदत करण्याच्या उद्देशाने या शिष्यवृत्त्यांची आखणी करण्यात आली आहे. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून येणाऱ्या तीन वर्षांमध्ये अॅन्सीस संस्था प्रत्येक वर्षी दोन वर्षांचा एमटेक अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा खर्च उचलेल. आयआयटी- मुंबई येथे एमटेकचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना या शिष्यवृत्तीचा लाभ होणार आहे. अॅन्सीस संस्थेचे आयआयटी संस्थेशी खूप वर्षांचे संबंध असून तंत्रज्ञान आणि शिक्षण यांच्या एकत्रित सामर्थ्यावर आम्ही नेहमीच विश्वास ठेवला असून आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत. सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या क्षेत्रात काही अत्यंत मूलभूत पर्याय देणाऱ्या संशोधनाच्या निष्कर्षांची आम्ही उत्सुकतेने वाट पहात आहोत, असे या उपक्रमाविषयी अॅन्सीसचे भारत-दक्षिण आशिया प्रशांत महासागर क्षेत्राचे उपाध्यक्ष रफिक सोमाणी यांनी सांगितले. २०१९ मध्ये अॅन्सीस संस्थेने, डॉक्टरेट मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सुरुवात केल्यानंतर आता एमटेकचे शिक्षण घेणाऱ्या आणि गरीब पार्श्वभूमीतून आलेल्या विद्यार्थिनींना मदत करण्यासाठी पुन्हा एकत्र येत असल्याबद्दल आम्हाला अत्यंत आनंद होत असल्याचे आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थी आणि कॉर्पोरेट संबंध या विषयाचे प्राध्यापक डॉ. सुहास जोशी यांनी स्पष्ट केले. समाजावर उत्तम परिणाम करणाऱ्या आणि शिक्षण, आरोग्य, पर्यावरणीय शाश्वतता, स्त्रोतांचे जतन आणि तंत्रज्ञान या संबंधीच्या संशोधनाला वेग देण्याच्या उद्देशाने महिला संशोधक आणि वंचित समाजाची पार्श्वभूमी असणारे संशोधक यांना अॅन्सीसची संशोधन शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jAHSNG
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments