Also visit www.atgnews.com
CBSE 12th Result: बारावीचा निकाल जाहीर, SMS, App, IVRS च्या माध्यमातून असा पाहा
12th Result: सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. आहे. अधिकृत वेबसाइट cbse.gov.in (cbse.nic.in) निकाल जाहीर होईल. cbseresults.nic.in या लिंकवर रिझल्ट पाहता येईल. बऱ्याचदा हेवी ट्रॅफीक आणि लोडमुळे सीबीएसई वेबसाइट क्रॅश होते आणि विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. पण आता अशी काळजी करण्याची गरज नाही. वेबसाइटव्यतिरिक्त सीबीएसई बारावीचे विद्यार्थी इतर अनेक पद्धतीने निकाल पाहू शकतात. एसएमएस, उमंग अॅप आणि डिजिलॉकरच्या माध्यमातून निकाल पाहता येऊ शकतो. app: असा पाहा रिझल्ट उमंग अॅप (Umand App): आपल्या स्मार्टफोनमध्ये गुगल प्ले स्टोरमध्ये जाऊन उमंग अॅप डाऊनलोड करा. अॅपमध्ये रजिस्टर करा. CBSE Result संबंधित टॅबवर क्लिक केल्यानंतर आपली माहिती भरुन सबमिट करा. रिझल्ट स्क्रिनवर दिसेल. तो डाऊनलोड करा. CBSE 12th result digilocker: सीबीएसई अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांचा रिझल्ट आणि मार्कशिटसाठी डिजिलॉकरचा वापर करत आहे. digilocker.gov.in वर जा. नोंदणी केली असेल तर लॉगिन करा. अन्यथा आधी रजिस्टर करा आणि लॉगिन करा. तुम्हाला रिझल्ट आणि मार्कशिटची लिंक दिसेल. SMS: सीबीएसईतर्फे दरवर्षी रिझल्ट तपासण्यासाठी एसएमएस आणि आयवीआरएसची सुविधा दिली जाते. एसएमएसद्वारे सीबीएसई बारावीचा निकाल मिळवण्यासाठी मोबाईल मेसेज बॉक्समध्ये CBSE12(स्पेस)(रोल नंबर) (स्पेस) आणि ७७३८२९९८९९ या नंबरवर पाठवावा. CBSE 12th result : सीबीएसई बारावी रिझल्टसाठी आयव्हीआरएस रिझल्ट (CBSE Result IVRS)च्या सुविधेचा लाभ घेऊ शकता. यासाठी खाली देण्यात आलेल्या नंबरवर कॉल करावा लागेल. फोनवर कॉम्प्युटराइज्ड आवाज ऐकायला मिळेल. निर्देश मिळाल्यावर आपला रोल नंबर आणि जन्मतारीख टाइप करा. त्यानंतर तुम्हाला रिझल्ट सांगितला जाईल. दिल्लीच्या विद्यार्थ्यांसाठी नंबर- २४३००६९९ दिल्ली बाहेरील विद्यार्थ्यांसाठी नंबर- ०११-२४३००६९९
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zLra2S
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments