CBSE 12th Result: सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर

सीबीएसई बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती, ते आपला वैयक्तिक निकाल दुपारी २ वाजल्यापासून बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकणार आहेत. वेबसाइट क्रॅश होऊ नये म्हणून बोर्डाने निकालासाठी तीन लिंक उपलब्ध करून दिल्या आहेत. देशभरातून एकूण १४ लाख ३० हजार १८८ विद्यार्थ्यांनी सीबीएसई बारावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी १३ लाख ६९ हजार ७४५ विद्यार्थी नियमित तर ६० हजार ४४३ विद्यार्थी खासगीरित्या नोंदणीकृत होते. नियमित विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला आहे. खासगी विद्यार्थ्यांची परीक्षा १६ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. एकूण १३ लाख ४ हजार ५६१ विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला आहे. यापैकी १२ लाख ९६ हजार ३१८ विद्यार्थी उत्तीर्णय झाले आहेत. निकालाची एकूण टक्केवारी ९९.३७ आहे. किती विद्यार्थी उत्तीर्ण कुल उत्तीर्ण विद्यार्थिनी - ९९.६७ टक्के एकूण उत्तीर्ण विद्यार्थी - ९९.३ टक्के एकूण उत्तीर्ण ट्रान्सजेंडर - १०० टक्के पुढील थेट लिंकवर पाहता येणार सीबीएसई बारावीचा निकाल - असा तपासा निकाल - बोर्डाच्या या अधिकृत वेबसाइटवर जा. - सीबीएसई रिझल्टच्या लिंकवर क्लिक करा. -या पेजवर दहावी आणि बारावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा. - मागितलेली माहिती भरुन लॉगिन करा. -तुमचा रिझल्ट स्क्रिनवर दिसेल. इथे विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात. -भविष्यातील उपयोगासाठी याची प्रिंट घेऊन ठेवा. ६५,१८४ विद्यार्थ्यांचा निकाल प्रलंबित ६५,१८४ विद्यार्थ्यांची निकाल प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. या विद्यार्थ्यांचा निकाल ५ ऑगस्ट २०२१ पर्यंत जाहीर होणार आहे. कुठे पाहाल निकाल? शुक्रवारी ३० जुलै रोजी दुपारी २ वाजता निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in, cbse.gov.in आणि अन्य डिजिटल प्लॅटफॉर्म डिजिलॉकर वेबसाइट digilocker.gov वर पाहू शकता. तसेच SMS, IVRS आणि UMANG अॅपच्या माध्यमातून निकाल पाहू शकता.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2WBjqCp
via IFTTT

Post a Comment

0 Comments