CBSE 12th Roll Number 2021: या स्टेप्स फॉलो करुन मिळवा रोल नंबर

12th 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (CBSE) आज दुपारी २ वाजता बारावीचा निकाल जाहीर करणार आहे. यावर्षी करोनामुळे परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे हॉल तिकिट देखील देण्यात आले नव्हते. दरम्यान, बारावीचे विद्यार्थी खालील स्टेप्स फॉलो करुन आपला निकाल पाहू शकतात. बारावीच्या विद्यार्थ्यांना आपल्या आई वडिल्यांच्या नावासोबत शाळेचा कोड टाकावा लागेल, विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत फोन करुन कोड मिळू शकतो. CBSE Class 12 Roll Number 2021: असा तपासा रोल नंबर स्टेप १ - सर्वात आधी अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर जा. स्टेप २- आपले नाव, आई वडिलांचे नाव, जन्म तारीख आणि शाळेचा कोड टाका स्टेप ३ - आता 'Search Data' वर क्लिक करा स्टेप ४ - मागितलेली माहिती भरा. रोल नंबर तुमच्या समोर असेल स्टेप ५ - भविष्यातील उपयोगासाठी प्रिंटआऊट काढून ठेवा. बातमीखाली दिलेल्या लिंकवर जाऊन रोल नंबर तपासू शकता. असा तपासा निकाल सीबीएसईतर्फे आज दुपारी २ वाजता बारावी निकाल २०२१ ची घोषणा झाल्यानंतर वर दिल्या गेलेल्या अधिकृत वेबसाइटवर जा. याची थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे. सीबीएसई रिझल्टच्या लिंकवर क्लिक करा. या पेजवर दहावी आणि बारावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा. मागितलेली माहिती भरुन लॉगिन करा. तुमचा रिझल्ट स्क्रिनवर दिसेल. इथे विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात. भविष्यातील उपयोगासाठी याची प्रत राखून ठेवा. दुपारी २ वाजता निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in, cbse.gov.in आणि अन्य डिजिटल प्लॅटफॉर्म डिजिलॉकर वेबसाइट digilocker.gov वर पाहू शकता. तसेच SMS, IVRS आणि UMANG अॅपच्या माध्यमातून निकाल पाहू शकता. बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लावताना दहावी, अकरावी आणि बारावीच्या यूनिट टेस्ट, मिड टर्म आणि प्री बोर्ड परीक्षांचे गुण ग्राह्य धरले गेले आहेत. यानुसार दहावी आणि अकरावीच्या गुणांचे वेटेज ३०-३० टक्के आणि बारावीच्या गुणांची वेटेज ही ४० टक्के आहे. याचप्रमाणे दहावीच्या निकालासाठी पाचमधील सर्वोत्तम ३ विषयांचे गुण ग्राह्य धरले गेले आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3BWr5LS
via IFTTT

Post a Comment

0 Comments