CBSE चा दहावी,बारावी निकाल कधी? बोर्डाने दिलं मजेशीर उत्तर

CBSE class 10th 12th results 2021 latest update:सीबीएसई दहावी, बारावीच्या निकालासंदर्भात पहिल्यांदाच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE)मजेशीर माहिती दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लाखो विद्यार्थी आणि पालक हा प्रश्न उपस्थित करत आहेत की निकाल कधी लागणार. पण बोर्डाकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. आता सीबीएसईने एक मीम शेयर करत यासंबंधी सूचना दिली आहे. या मीममध्ये सीबीएसईने अमेझॉन प्राइम वीडियो (Amazon Prime Video) वरील हिट शो फॅमिली मॅन (Family Man) चा संदर्भ दिला आहे. फॅमिली मॅनमधील मुख्य पात्र श्रीकांत तिवारी (Shrikant Tiwari)म्हणजेच मनोज वाजपेयी आणि दुसरीकडे चेल्लम सर (Chellam Sir) म्हणजेच उदय महेश यांचे छायाचित्र वापरून हे मीम तयार करण्यात आले आहे. मीममध्ये मनोज वायपेयी (Manoj Bajpayee) म्हणजेच श्रीकांत तिवारी, चेल्लम सरांना (Uday Mahesh)विचारतोय की, 'सर वो.. अथर्व का सीबीएसई रिजल्ट कब आयेगा? मैं काफी परेशान हूं।' यावर चेल्लम सर उत्तर देतात की कि 'एक #MinimumParent मत बनो श्री। आशावादी बनो। चिंता मत करो। जल्द ही आयेगा।' या वेबसिरीजमधला हा प्रसिद्ध डायलॉग आहे - 'एक मिनिमम गाय मत बनो.' त्या धर्तीवर सीबीएसईने पालकांना धीर धरण्याचं आवाहन केलं आहे. लवकरच निकाल जाहीर होईल, असं आश्वस्तही केलं आहे. यावर यूझर्सकडूनही प्रतिक्रिया न आल्या असत्या तरच नवल होते. कोणी आपला राग व्यक्त केलाय, तर कोणी तितक्याच गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3l8wauk
via IFTTT

Post a Comment

0 Comments