CLAT 2021: क्लॅट परीक्षेचा निकाल जाहीर

2021: देशभरातील विविध नॅशनल लॉ यूनिवर्सिटी (NLU)आणि अन्य विधी संस्थांमधील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणाऱ्या कॉमन लॉ ऐडमिशन टेस्ट (CLAT)२०२१ च्या निकालांची घोषणा करण्यात आली आहे. प्रवेश परीक्षा आयोजित करणारी संस्था कन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ यूनिवर्सिटीज (CNLU) द्वारे २०२१ ची घोषणा ऑफिशियल वेबसाइट, वर करण्यात आली आहे. या लिंकमार्फत पाहा आपला निकाल सीएनएलयूने क्लॅट 2021 यूजी आणि पीजी प्रवेश परीक्षांचे आयोजन देशभरातील ८२ शहरांतील विविध १४७ परीक्षा केंद्रांवर करण्यात आले होते. मागील आठवड्यात २३ जुलै २०२१ रोजी पेन-पेपर मोडवर या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. परीक्षेसाठी ७०,२७७ उमेदवारांनी नोंदणी केली होती. ६६,८८७ उमेदवारांनी प्रवेशपत्र डाऊनलोड केले होते. ६२,१०६ उमेदवारांनी ही परीक्षा दिली. पुढील पद्धतीने स्टेप बाय स्टेप चेक करा निकाल - क्लॅट यूजी किंवा पीजी परीक्षेत सहभागी झालेल्या उमेदवारांनी आपला क्लॅट २०२१ निकाल तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइट वर जा. - - होमपेज वर दिलेल्या नोटिफिकेशनमध्ये उपलब्ध करण्यात आलेल्या लिंक वर क्लिक करा. - रजिस्ट्रेशन नंबर, रोल नंबर, आदि माहिती भरून सबमीट करा. - उमेदवार आपला निकाल आणि स्कोर स्क्रीन वर पाहू शकतील. - निकालाचे प्रिंटआऊट घ्या. सॉफ्ट कॉपीदेखील सेव्ह करून ठेवा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zLK4GP
via IFTTT

Post a Comment

0 Comments