IBPS RRB 2021: पूर्व परीक्षेचे प्रवेश पत्र कधी मिळणार? ट्रेनिंग कुठे होणार? सर्वकाही जाणून घ्या

IBPS RRB Admit Card 2021 for pre-exam training: प्रवेश पत्र २०२१ ची वाट पाहणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आयबीपीएस (IBPS) लवकरच पूर्व परीक्षेच्या ट्रेनिंगसाठी प्रवेश पत्र जाहीर करणार आहे. ज्या उमेदवारांनी अर्ज केलाय ते आयबीपीएसची अधिकृत वेबसाईट ibps.in वर जाऊन प्रवेश पत्र डाऊनलोड करु शकता. पुर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी आयबीपीएस प्रवेश पत्र (IBPS RRB admit card 2021)अधिकृत वेबसाईटवर ९ जुलैलाा जाहीर केले जाणार आहे. करोना स्थिती नियंत्रणात असेल आणि पूर्व परीक्षा घेणे सुरक्षित आणि शक्य असेल तेव्हा ही परीक्षा घेतली जाईल, असे आयबीपीएसने आधी म्हटले होते. आयबीपीएसने जारी केलेल्या अधिकृत नोटिसनुसार, “ग्रामीण बँके (RRB)द्वारे होणारे पूर्व परीक्षा प्रशिक्षण हे अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्यांक, माजी सैनिक, दिव्यांगांसाठी, ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) आणि एससी, एसटी किंवा अल्पसंख्यक समुदायासाठी ऑफिस स्केल- I पदासाठी आयोजित केले जाते. आयबीपीएस आरआरबी पूर्व परीक्षा प्रशिक्षण केव्हा ? आयबीपीएस आरआरबी प्री-एक्झाम ट्रेनिंग १९ जुलै ते २५ जुलैपर्यंत होण्याची शक्यता आहे. त्यानंतर, आयबीपीएस आरआरबी प्रीलिम्स एक्झाम प्रवेश पत्र (IBPS RRB prelims admit card) जाहीर केले जाणार आहे.आयबीपीएसने परीक्षेच्या तारखांची घोषणा केली नाही. कुठे असणार ट्रेनिंग सेंटर्स? दिलेल्या माहितीनुसार वारंगल, अनंतपुर, नाहरलागुन (पापुमपारे), गुवाहाटी, अजमेर, रायबरेली, गुंटूर, रायपुर, गांधीनगर, श्रीनगर, लखनऊ, मंडी, जम्मू, रांची, वाराणसी, पटना, इंफाल, जोधपुर, शिलंग, इजोल, कोहिमा , भुवनेश्वर, सेलम, हावडा, मुरादाबाद, पुडुचेरी, लुधियाना, गोरखपुर, रोहकट, राजकोट, हैदराबाद, इसतला, मुजफ्फरपुर, देहरादून आणि नागपूर याठिकाणी ट्रेनिंग सेंटर्स असणार आहेत. असे डाऊनलोड करा आयबीपीएसची अधिकृत वेबसाईट ibps.inने होमपेजवर प्रवेश पत्राची लिंक अॅक्टीव्ह केली जाईल. यावर क्लिक करुन नोंदणी क्रमांक, जन्म तारीख आणि अनुभव प्रमाणपत्र भरा. प्रवेश पत्र स्क्रीनवर खुले होईल. हे डाऊनलोड करा आणि प्रिंट काढून स्वत:कडे ठेवा. प्रवेश पत्रावर दिलेले निर्देश काळजीपूर्वक वाचा. ऑफिस असिस्टंट पदासाठी मुख्य परीक्षेचे आयोजन ३ ऑक्टोबर २०२१ रोजी होणार आहे. ऑफिस स्केल २ आणि ३ साठी परीक्षा २५ सप्टेंबर रोजी होणार आहे. कोणत्या पदांसाठी परीक्षा? आरआरबी ऑफिसर्स (स्केल १, २,३) आणि ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) पदांच्या पदवीसाठी इच्छुक असणाऱ्यांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री आवश्यक आहे. पदानुसार शैक्षणिक योग्यतेची विस्तृत माहिती आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइटवर तपासू शकता. ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) पदासाठी वयमर्यादा १८ ते २८ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. ऑफिसर स्केल १ (असिस्टंट मॅनेजर) साठी १८ वर्षापेक्षा जास्त आणि ३० वर्षापेक्षा कमी, ऑफिस स्केल २ (मॅनेजर) २१ वर्षापेक्षा जास्त आणि ३२ वर्षापेक्षा कमी आणि ऑफिस स्केल ३ (सीनियर मॅनेजर) २१ वर्षे ते ४० वर्षांहून कमी वयाचा कालावधी निश्चित केला गेला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3AtalLn
via IFTTT

Post a Comment

0 Comments