ICMR Fellowship 2021: वैद्यकीय संशोधन फेलोशिप प्रवेश परीक्षेसाठी अर्ज सुरु

JRF Entrance Exam 2021 Application: इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने वर्ष २०२१ साठी ज्युनिअर रिसर्च फेलोशिप प्रवेश परीक्षेची (Fellowship 2021)अर्ज प्रक्रिया आजपासून सुरु केली आहे. यासोबतच जेआरएफ परीक्षेसाठी माहिती पत्रक देखील अपलोड करण्यात आले आहे. ३१ जुलै २०२१ ही या परीक्षेची शेवटची तारीख आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईट main.icmr.nic.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करु शकतात. इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने २०२१ साठी फेलोशिप परीक्षा(Fellowship 2021) ची घोषणा केली आहे. आयसीएमआर जेआरएफ २०२१ (ICMR JRF 2021) परीक्षा १२ सप्टेंबरला होणार आहे. ही कॉम्प्युटर आधारित परीक्षा असणार आहे. परीक्षेच्या तारखेसहीत पूर्ण शेड्यूल जाहीर केले आहे. या वेळेस ही परीक्षा पीजीएमआर चंदीगड (PGIMER Chandigarh) च्या सहयोगाने आयोजित केली आहे. आयसीएमआर ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (ICMR JRF) परीक्षा सप्टेंबर २०२१ मध्ये होणार आहे. आयसीएमआरने जाहीर केलेल्या शेड्यूलनुसार,परीक्षा रविवार, १२ सप्टेंबर २०२१ दुपारी ३ पासून संध्याकाळी ४.३० पर्यंत देशाच्या वेगवेगळ्या केंद्रांवर होणार आहे. नोटिफिकेशन आणि अर्जाची माहिती आयसीएमआर नवी दिल्ली आणि पीजीआयएमइआर चंदीगडच्या वेबसाइट्सवर या परीक्षेचे नोटिफिकेशन जूनच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होईल. अर्ज भरण्याची प्रक्रिया १ जुलैपासून ३१ जुलै २०२१ पर्यंत सुरु आहे. ही संभाव्य तारीख आहे. आयसीएमआर जेआरएफ काय आहे ? आयसीएमआर जेआरएफ परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही देशातील कोणतेही मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल, युनिव्हर्सिटी किंवा नॅशनल लॅबोरेटरीमध्ये पीएचडी (PhD), रिसर्च (Research) साठी प्रवेश घेऊ शकतात. या परीक्षेत यशस्वी होणाऱ्या १५० उमेदवारांना फेलोशिप दिली जाईल. एमएससी, एमए किंवा त्या समकक्ष पदवी पूर्ण केलेले विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. यासाठी तुमचे वय २८ वर्षांपेक्षा अधिक असू नये. ओबीसी वर्गासाठी ३ वर्षांची सवलत आणि एससी, एसटी, दिव्यांगांसाठी ५ वर्षांची सवलत मिळेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qLvdsL
via IFTTT

Post a Comment

0 Comments