आयडॉल सुरु करणार दूरस्थ माध्यमातून एमएमएस अभ्यासक्रम

Update : मुंबई विद्यापीठाची () दूर व मुक्त अध्ययन संस्था (Institute of Distance & Open learning Or IDOL) दूरस्थ शिक्षणाच्यामाध्यमातूनमास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज म्हणजेच एमएमएस () हा व्यवस्थापनाचा महत्वाचा अभ्यासक्रम लवकरच सुरु करणार आहे. हा अभ्यासक्रम आयडॉल मधून सुरु करण्यास विद्यापीठाच्या विद्वत परिषदेने मान्यता दिली आहे. यानंतर युजीसी-डीईबीने मान्यता दिल्यानंतर हा अभ्यासक्रम सुरु केला जाणार आहे. दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून सुरु होणारा व्यवस्थापन शाखेचा एमएमएस हा अभ्यासक्रम दोन वर्षाचा असून तो चार सेमिस्टर मध्ये विभागाला गेला आहे. आयडॉल व नियमितमहाविद्यालयाचा एमएमएसचा अभ्यासक्रम सारखाच आहे. विद्यापीठाच्या विद्वत परिषदेने या अभ्यासक्रमाला मान्यता दिली आहे. यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या डिस्टन्स एज्युकेशन ब्युरोकडे पुढील मान्यतेसाठी पाठविला जाईल. त्यांची मान्यता मिळाल्यानंतर हा एमएमएस अभ्यासक्रम पुढील शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून सुरु करण्याचा मानस आहे, असे आयडॉलचे संचालक डॉ. प्रकाश महानवर यांनी सांगितले. या एमएमएस अभ्यासक्रमाचे अध्ययन साहित्य तयार करण्यातयेईल. तसेच एमएमएसचेदूरस्थ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना असायनमेंट, प्रोजेक्ट असणार आहेत.या विद्यार्थ्यांसाठी विविध अभ्यासकेंद्रामधून प्रत्यक्ष मार्गदर्शन व प्रात्यक्षिक घेतले जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शनही केले जाणार आहे.यासाठी आयडॉलमध्ये एमएमएस अभ्यासक्रमासाठी शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे.या एमएमएस अभ्यासक्रमाच्याप्रवेशासाठी आयडॉल स्वतंत्र 'प्रवेश परीक्षा' घेणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2SJvY9g
via IFTTT

Post a Comment

0 Comments