Also visit www.atgnews.com
PCMC Recruitment2021: पिंपरी-चिंचवड पालिकेत भरती, ५ ते ७ जुलैपर्यंत करा अर्ज
PCMC Recruitment2021: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये नोकरी करण्याची संधी आहे. यासाठी पालिकेतर्फे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पालिकेत आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर ही भरती होणार आहे. या ठिकाणी शिक्षक पदाच्या एकूण २९ जागा भरण्यात येणार आहेत. पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे. शिक्षक पदाच्या एकूण २९ जागा रिक्त आहेत. यामध्ये वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी आणि वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ५ ते ७ जुलै २०२१ रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहणे गरजेचे आहे. उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहावे. ओबीजीवाय / बालरोग सेमिनार हॉल, दुसरा मजला, पीजीआय वायसीएमएच, पिंपरी- १८ या पत्त्यावर मुलाखत होणार आहे. उमेदवारांना सकाळी ९ वाजता दिलेल्या पत्त्यावर रिपोर्टींग करावे लागणार आहे. ९.३० च्या नंतर मुलाखतीला सुरुवात होईल. महत्वाची कागदपत्र वयासाठी-जन्मदाखला/दहावी प्रमाणपत्र/पासपोर्ट/लायसन्स आधार कार्ड पदवी आणि पदव्युत्तर प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र, कास्ट वॅलिडीटी आणि नॉन क्रिमिनियल (पात्र असल्यास) अनुभव प्रमाणपत्र पीजी टीचर अप्रुवल सर्टिफिकेट (पात्र असल्यास) रिसर्च पब्लिकेशन (पात्र असल्यास) पीएचडी गाईड (पात्र असल्यास) एमएससीआयटी कॉल इंटर्व्यू म्हणजे नोकरी मिळाली असे नाही. उमेदवार निवडण्याचा अधिकार निवड समितीकडे राहील. मुलाखत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निकाल जाहीर केला जाईल. उमेदवारांनी मुलाखतीला येताना मूळ कागदपत्र आणि त्यांची झेरॉक्स सोबत ठेवणे गरजेचे आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yaXewq
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments