भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदांची भरती, २ जुलैपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात

Indian 2021 : भारतीय नौदलात स्पेशल नेवल अ‍ॅडिएंटेशन कोर्स अंतर्गत इंफोर्मेन्शन टेक्नोलॉजी (IT)साठी शॉर्ट सर्व्हिस कमीशन (SSC)अधिकारी पदाची भरती निघाली आहे. यासाठी अधिकृत नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. तरुणांसाठी भारतीय नौदलात जाऊन देशसेवा करण्याची चांगली संधी आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया २ जुलैपासून सुरु होणार आहे. या भरती अभियानाच्या माध्यमातून भारतीय नौदलात शॉर्ट सर्विसेस कमिशन ऑफिसरच्या पदांच्या एकूण ४५ जागा रिक्त आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार joinindiannavy.gov.in वर जाऊन अर्ज भरु शकतात. अर्ज करण्याआधी बातमी खाली दिलेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कॉम्प्युटर सायन्स पास किंवा कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगमध्ये किमान ६० टक्के गुणांसह बीई किंवा बीटेकची पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय आयटी, एम.एससी (कॉम्प्युटर/ आयटी), एमसीए, एम.टेक (कॉम्प्युटर सायन्स किंवा आयटी) हे मान्यता प्राप्त विद्यापीठातून असणे गरजेचे आहे. अर्जदाराचे वय २ जानेवारी १९९७ ते १ जुलै २००२ च्या दरम्यान असणे आवश्यक आहे. स्पेशल नेवल अ‍ॅरिएंटेशन कोर्सच्या अंतर्गत आयटीसाठी एसएससी अधिकारी जानेवारी २०२२ मध्ये भारतीय नौदल अकादमी, एझिमालामध्ये सुरु होणार आहे. अविवाहीत पुरुषांसाठी ४५ जागा रिक्त आहेत. कालावधी निवडलेल्या उमेदवारांना १० वर्षांसाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशन दिले जाणार आहे. पुढची गरज, परफॉर्मन्स, मेडिकल एलिजिबिलीटी आणि उमेदवारांच्या इच्छेनुसार २ अटी (२ वर्ष + २ वर्ष) अधिक ४ वर्षे वाढवला जाऊ शकतो.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2SEy0r4
via IFTTT

Post a Comment

0 Comments