Also visit www.atgnews.com
WHOकडून करोना काळात शाळांना निर्देश, जाणून घ्या सविस्तर
gives for : करोनाचा वाईट परीणाम जगभरातील मुलांच्या शिक्षणावर झालाय. बंद असल्याने विद्यार्थी प्रत्यक्ष शिक्षणाला मुकली आहेत. आता करोनाची परीस्थिती पाहून शाळा सुरु करण्याचा निर्णय होईल. या पार्श्वभुमीवर जागतिक आरोग्य संघटना (World Health Organization)ने शाळांना करण्याचा सल्ला दिला आहे. कोणतीही करोनाचे प्रकरण समोर येण्याआधी या चाचणी करुन घ्या असे WHO ने म्हटले आहे. याआधी करोनाचे कोणते प्रकरण समोर आल्यानंतरच सर्वांना चाचणी करण्याचा सल्ला दिला जात होता. पण आता विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी लक्षणे नसली तरी पीसीआर आणि रॅपिड एंटीजन (PCR or rapid antigen tests)चाचणी करायला हवी. यामुळे शिक्षणाला कोणती अडचण येणार नाही असे स्पष्ट निर्देश WHO ने दिले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेतर्फे करोना काळात शाळा आणि इतर आस्थापनांना वेळोवेळी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. WHOचे यूरोप क्षेत्रीय प्रमुख हॅंस क्लूज यांनी यासंदर्भात अधिकृत स्टेटमेंट जाहीर केले आहे. सध्याच्या वातावरणात संक्रमण कमी करण्याची चांगली संधी आहे. भविष्यात संक्रमण रेट आटोक्यात आणण्यासाठी जास्तीत चाचण्या होणे गरजेचे आहे. शाळा बंद कराव्या लागल्यामुळे मुलांचे शिक्षण, सामाजिक आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होत असल्याचे आपण पाहील्याचे ते म्हणाले. या महामारीमुळे मुलांच्या शिक्षण आणि विकासावर वाईट परिणाम होऊ नये. अशावेळी प्रत्येक शक्य प्रयत्न आम्ही करु ज्यामुळे शिक्षणावर होणारा परिणाम थांबवला जाऊ शकेल असे ते म्हणाले. करोना प्रादुर्भावामुळे देशातील शाळा बंद आहेत. पण इतर करोना निय्ंत्रणात आलेल्या देशांमध्ये शाळा हळुहळू पुर्वपदावर येत आहेत. असे असले तरी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळांनी योग्य ती पाऊले उचलणे गरजेचे आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xgOHI3
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments