Also visit www.atgnews.com
AICTE news: BTech करताना दुसऱ्या इंजिनीअरिंग अभ्यासक्रमासाठी घेऊ शकता प्रवेश
Lateral Entry: इंजिनीअरिंग शिकणाऱ्या किंवा त्यासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) विद्यार्थ्यांना त्यांच्या बीटेक अभ्यासक्रमाच्या मध्यात शाखा बदलण्याची परवानगी दिली आहे. यासंदर्भात महाविद्यालयांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच काउन्सिलने लेटरल एंट्रीसाठी काही नियम देखील आखून दिले आहेत. विद्यार्थ्यांकडून यासंदर्भात वारंवार मागणी होत होती. तसेच परिषदेकडे यासंदर्भात अनेक विनंत्याही येत होत्या असे एसआयसीटीईतर्फे सांगण्यात आले. एआयसीटीईच्या कार्यकारी समितीसमोर हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यानंतर याला मान्यता देण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांना बीटेक किंवा बीई अभ्यासक्रमा दरम्यान आपली शाखा बदलण्याची इच्छा असेल त्यांना तंत्रशिक्षण संस्थेकडून तसे करण्याची परवानगी देण्यात येईल असे समितीने यावेळी स्पष्ट केले. AICTE Lateral Entry Guidelines: नियम जाणून घ्या दुसर्या कोर्स/शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या शाखेच्या अभ्यासक्रमादरम्यान अभ्यास केलेल्या कोर्सचा भाग पुन्हा अभ्यासण्याची आवश्यकता राहणार नाही. या अभ्यासक्रमामध्ये प्रॅक्टीकल्सची गरज असते. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना कोणत्याही संस्थेत किंवा विद्यापीठात इतर विद्यार्थ्यांप्रमाणे नियमित प्रवेश घ्यावा लागेल. याशिवाय, एआयसीटीईने अतिरिक्त पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षांवरून वाढवून आता तीन वर्षे केला आहे. काउन्सिलने दिलेल्या माहितीनुसार, मूळ अभ्यासक्रमाच्या शिस्तीचा भंग होऊ नये आणि आवश्यक क्रेडिट्स पूर्ण केले म्हणून अभ्यासक्रमाचा कालावधी वाढवण्यात आला आहे असे काउन्सिलतर्फे सांगण्यात आले. एआयसीटीईने सर्व संलग्न संस्थांच्या कोर्स रचना आणि नियमांमध्ये आवश्यक बदल करण्याच्या सूचना जाहीर केल्या आहेत. यासह, बी.टेक विद्यार्थ्यांना अतिरिक्त अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश आणि अभ्यासक्रम आयोजित करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास सांगितले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2VRK7T2
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments