Also visit www.atgnews.com
AICTE २०२१-२२चे सुधारित शैक्षणिक वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या डिटेल्स
Revised 2021-22: अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) सुधारित २०२१-२२ जाहीर केले आहे. हे सुधारित शैक्षणिक कॅलेंडर सर्व AICTE मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठांना लागू होणार आहे. हे वेळापत्रक स्वतंत्र PGDM किंवा PGCM संस्थांमध्ये (standalone PGDM/PGCM institutions)सध्या शिक्षण घेत असलेल्या आणि नव्या विद्यार्थ्यांसाठी देखील लागू असणार आहे. ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) ने सत्र २०२१-२२ साठी सुधारित शैक्षणिक कॅलेंडर जाहीर केले आहे. AICTE ने जाहीर केलेल्या सुधारित शैक्षणिक वेळापत्रक २०२१-२२ ची संपूर्ण माहिती अधिकृत वेबसाइट aicte-india.org वर पाहता येणार आहे. सुधारित शैक्षणिक वेळापत्रक २०२१-२२ नुसार, तांत्रिक अभ्यासक्रम प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग सुरू करण्याची २५ ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे. या विद्यार्थ्यांचे वर्ग COVID-19 सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे लक्षात घेऊन ऑनलाइन किंवा ऑफलाइन माध्यमातून होणार आहे. दुसऱ्या वर्षातील नवीन प्रवेशासाठी ३० ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे. प्रवेशासाठी एक महिन्याचा अतिरिक्त वेळ परिषदेने (AICTE)यापूर्वी पीजीडीएम किंवा पीजीसीएम संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अतिरिक्त एक महिन्याचा वेळ दिला होता. १० जुलै ही प्रवेशाची तारीख ११ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली होती. सुधारित शैक्षणिक कॅलेंडर पुढीलप्रमाणे आहे. टेक्निकल इंस्टिट्यूटसाठी महत्वाच्या तारखा (स्वतंत्र PGDM/PGCM संस्थांसाठी लागू नाहीत) विद्यापीठ किंवा मंडळाने मान्यता देण्याची अंतिम तारीख: ३१ ऑगस्ट २०२१ तांत्रिक अभ्यासक्रमांच्या सध्याच्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग सुरू करण्याची शेवटची तारीख: १ ऑक्टोबर २०२१ इंडक्शन कार्यक्रमाची सुरुवात: १ ऑक्टोबर २०२१ फी पूर्ण परताव्यासह सीट रद्द करण्याची शेवटची तारीख: २० ऑक्टोबर २०२१ प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम तारीख: २५ ऑक्टोबर २०२१ प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग सुरू करण्याची शेवटची तारीख: २५ ऑक्टोबर २०२१ नव्या विद्यार्थ्यांसाठी द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची अंतिम तारीख: ३० ऑक्टोबर २०२१ स्वतंत्र PGDM किंवा PGCM संस्थांसाठी महत्वाच्या तारखा फीच्या पूर्ण परताव्यासह सीट रद्द करण्याची शेवटची तारीख: १३ सप्टेंबर २०२१ पीजीडीएम/पीजीसीएम संस्थांमध्ये प्रवेश घेण्याची अंतिम तारीख: २० सप्टेंबर २०२१
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3m5sPNa
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments