JEE Main Admit Card 2021: जेईई मेन अंतिम सत्रासाठी प्रवेश पत्र कधी? जाणून घ्या डिटेल्स

Main : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency, NTA) तर्फे जेईई मेन परीक्षा २०२१ च्या चौथ्या सत्राचे प्रवेश पत्र लवकरच जाहीर होणार आहे. उमेदवारांना एनटीएची अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर पाहता येणार आहे. परीक्षेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांना प्रवेश पत्रासंदर्भातील () सविस्तर माहितीसाठी वेबसाइट पाहणे गरजेचे आहे. जेईई मेन २०२१ च्या चौथे आणि अंतिम सत्र बीटेक आणि BArch प्रोग्राममधील प्रवेश २६, २७, ३१ आणि १ सप्टेंबर २०२१ ला आयोजित केली जाणार आहे. एनटीएतर्फे प्रवेश पत्रासंदर्भात (JEE Main 2021) कोणती अधिकृत माहिती देण्यात आली नाही. देशभर आयआयटी संस्थांमध्ये प्रवेशासाठी जेईई (अॅडवान्स्ड) २०२१ ची परीक्षा यावर्षी ३ ऑक्टोबर २०२१ ला होणार आहे. शिक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, करोनाच्या पार्श्वभूमीवर ३३४ शहरांमध्ये ही परीक्षा घेतली जात आहे. याआधी या परीक्षेचे आयोजन २३४ शहरांमध्ये करण्यात आले होते. यावेळेस प्रत्येक सत्रासाठी परीक्षा केंद्राची संख्या वाढविण्यात आली आहे. प्रत्येक सत्रासाठी सेंटर्सची संख्या ६६० ने वाढवून ८२८ करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार स्थानिक भाषांमध्ये जेईईची परीक्षा घेतली जाणार आहे. १३ भाषांमध्ये होणार परीक्षा देशातील कोणताही विद्यार्थी आपल्या मातृभाषेमध्ये इंजिनीअरिंग देऊ शकतो. यावेळेस १३ विविध भाषांमध्ये जेईई परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. चौथ्या सत्रासाठी जेईई मेन परीक्षा २६ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. जेईई (मेन) सत्र ४ साठी रजिस्ट्रेशन झाले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने चौथ्या सत्रासाठी नोंदणीची तारीख २० जुलैपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला होता. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या सल्ल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. चौथ्या सत्रासाठी नियम जेईई मेन २०२१ च्या चौथ्या सत्राची परीक्षा करोनाच्या पार्श्वभूमीवर निर्देशांचे पालन करुन आयोजित केली जाईल. जेईई मेन प्रवेश पत्रासोबतच विद्यार्थ्यांना मागील सत्राप्रमाणे एक सेल्फ डिक्लरेशन फॉर्म आणावा लागेल. यामध्ये उमेदवारांच्या आरोग्य स्थितीचा उल्लेख असेल. याशिवाय ट्रॅव्हल हिस्टरीचा रेकॉर्ड असेल. यामुळे परीक्षा केंद्र सुरक्षित राहतील. उमेदवारांना परीक्षा निरीक्षकाच्या उपस्थितीत सेल्फ डिक्लरेशन पत्रावर सही करावी लागणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3m6Z1zS
via IFTTT

Post a Comment

0 Comments