Also visit www.atgnews.com
दुय्यम निबंधक, मुद्रांक निरीक्षकांची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरणार
नोंदणी व मुद्रांक विभागातील (श्रेणी-१) / , गट-ब (अराजपत्रित) या संवर्गातील सरळ सेवेची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. विभागाच्या सेवाप्रवेश नियमानुसार, दुय्यम निबंधक (श्रेणी-१) / मुद्रांक निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित) या पदावर पदोन्नतीने व नामनिर्देशनाने नियुक्तीचे प्रमाण ५०:५० करण्याचा तसेच दुय्यम निबंधक (श्रेणी-१) / मुद्रांक निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित) ही पदे नामनिर्देशनाने आयोगामार्फत भरण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागात भरती दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. या विभागात १६ रिक्त जागा भरल्या जाणार असून यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २६ ऑगस्टपर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज केवळ ऑनलाइन माध्यमातून स्वीकारले जाणार आहेत. यासंदर्भातील सविस्तर माहिती https://ift.tt/3oZLYzp आणि https://mpsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. उमेदवाराच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांसदर्भातील माहिती https://mpsc.gov.in वेबसाइटवर उपलब्ध आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3satAWj
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments