Also visit www.atgnews.com
दिल्लीच्या विद्यार्थ्यांना मिळणार आंतरराष्ट्रीय बोर्डाचे शिक्षण
DBSE: सरकारच्या शालेय शिक्षण मंडळाने (DBSE) इंटरनॅशनल बॅक्लॉरिएट (IB) या आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त बोर्डाशी करार केला आहे. या कराराअंतर्गत दिल्ली शालेय शिक्षण मंडळाशी संलग्न सरकारी आणि खासगी शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण दिले जाणार आहे. DBSE आणि IB मधील या कराराची माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. आज आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने दिल्ली शिक्षण मंडळासोबत करार केला आहे. ही एक मोठी गोष्ट आहे. ही दिल्लीच्या लोकांसाठी खूप आनंदाची बाब आहे. आमची मुले आता दिल्लीत आंतरराष्ट्रीय स्तराचे शिक्षण घेतील असे मुख्यमंत्री केजरीवाल यावेळी म्हणाले. आयबी आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देते आणि हे जागतिक दर्जाचे मानले जाते. आम्हाला आंतरराष्ट्रीय बोर्डाचे शिक्षण मिळावे हे जगभरातील सर्व मोठ्या शाळांसोबतच आपल्या देशातील अनेक मोठ्या शाळांचेही स्वप्न आहे. जगभरात IB चा ५,५०० शाळांसोबत करार झाला आहे. हे बोर्ड १६९ देशांमध्ये कार्यरत आहे. तसेच, आयबीचे अमेरिका, कॅनडा, स्पेन, जपान, दक्षिण कोरिया आणि इतर अनेक देशांच्या सरकारसोबत देखील करार आहेत. डीबीएसई-आयबी करारामुळे होणाऱ्या फायद्यांबद्दल मुख्यमंत्री केजरीवाल यांनी माहिती दिली. “आपल्या देशात दोन प्रकारची शिक्षण व्यवस्था आहे, एक श्रीमंतांच्या मुलांसाठी आणि दुसरी गरीबांच्या मुलांसाठी. या करारामुळे आता डीबीएसईशी संलग्न सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या गरीब मुलांनाही जागतिक दर्जाचे शिक्षण मिळेल. या कराराअंतर्गत डीबीएसईशी संलग्न असलेल्या ३० सरकारी शाळांमधील तसेच संलग्न असलेल्या खासगी शाळांमधील शिक्षकांचे प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून केले जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. हे तज्ञ प्रत्येक शाळेला भेट देतील आणि त्यांची तपासणी, पडताळणी आणि प्रमाणन करतील जेणेकरून शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची होईल. तसेच, या शाळांमधील विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे केले जाईल हे आयबी ठरवेल असेही ते म्हणाले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Xic1Z4
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments