Also visit www.atgnews.com
'कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेत येण्यासाठी दबाव टाकला जाणार नाही'
Delhi : दिल्लीतील १ सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू होणार आहेत. १ सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग खुले करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सहावी ते आठवीला साधारण एक आठवड्यानंतर परवानगी देण्यात येणार आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री मनिष सिसोदिया यांनी यासंदर्भात माहिती दिली. शाळा पुन्हा न उघडण्याच्या सूचना फार कमी आहेत. हजारो पालकांनी आम्हाला शाळा उघडल्या पाहिजेत असा अभिप्राय दिला असे बहुतांश सूचनांमधून समोर आल्याचे ते यावेळी म्हणाले. सिसोदिया म्हणाले, 'गेल्या एका महिन्यात दिल्लीच्या सर्व शाळांमधील बहुतेक शिक्षकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. शाळांमध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही वर्ग एकाच वेळी घेतले जातील. पालकांच्या संमतीशिवाय कोणत्याही मुलाला शाळेत येण्यास भाग पाडले जाणार नाही. शिक्षणालाही पुन्हा रुळावर आणावे लागेल. दिल्लीत अर्थव्यवस्थेप्रमाणे शाळा आणि महाविद्यालये खुली केली पाहिजेत. अनेक राज्यांनी सहावी ते बारावीच्या वर्गांसाठी शाळा उघडल्या आहेत.' शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी एसओपी लवकरच जाहीर केली जाणार आहे. दिल्लीच्या शाळा पुन्हा उघडल्या जातील, शाळांमध्ये ऑफलाइन वर्ग होतील पण कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेत जाण्यास भाग पाडले जाणार नाही. विद्यार्थी त्यांचे ऑनलाइन वर्ग सुरू ठेवू शकतात असेही ते पुढे म्हणाले. शाळा आपल्या एसओपीसंदर्भात स्वत: निर्णय घेऊ शकतात. सोशल डिस्टन्सिंग आणि करोना सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन केले जात आहे याची खात्री शाळांनी करावी. कोणतीही शाळा, महाविद्यालय किंवा विद्यापीठ पुन्हा उघडले असले तरी सर्व बाबतीत सोशल डिस्टन्सिंग पाळावे लागणार असल्याचे सिसोदिया म्हणाले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/38jeipe
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments