Also visit www.atgnews.com
राज्यातील हजारो शिक्षकांचा वरिष्ठ व निवडश्रेणीचा प्रश्न सुटणार
मुंबई: राज्यातील हजारो शिक्षकांच्या वरिष्ठ व निवडश्रेणीसाठी आंदोलन करणारे भाजपा शिक्षक आघाडीच्या प्रयत्नांना यश आले असून शिक्षण विभागाकडून वरिष्ठ व निवडश्रेणीचे प्रशिक्षण सुरू करण्याबाबत तयारी सुरू झाली आहे. राज्यातील हजारो शिक्षकांना मागील काही वर्षांपासून वरिष्ठ व निवडश्रेणीसाठी पात्र असूनही प्रशिक्षण अभावी वेतनश्रेणी मिळत नव्हती याविरोधात भाजपा शिक्षक आघाडीने ५ सप्टेंबर रोजी पुणे येथील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या कार्यकायसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. याबाबत आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी १७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड तसेच विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना निवेदन पाठविले होते. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक एम डी सिंह यांनी शिक्षक आघाडीला शुक्रवारी पत्र पाठवून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे. तसेच या पत्रात शासनाकडून प्रशिक्षण आयोजित करण्याची तयारी करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. वरिष्ठ निवड वेतनश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमासाठी ऑनलाईन / ऑफलाईन अभ्यासक्रमाचा आराखडा निश्चित करण्यासाठी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय असे चार स्तरावर समिती गठित करण्यात आली आहे. सदरील समितीमध्ये वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणासाठी उद्दिष्टे, विषयांची निश्चिती, घटकांची निश्चिती, वेळापत्रक तयार करणे, घटकांचे सादरीकरण करणे व त्याला अंतिम स्वरुप देण्याचे कामकाज सुरु आहे. कोव्हिड परिस्थितीत ऑनलाईन १० दिवसांच्या प्रशिक्षण आयोजनाची पूर्वतयारी परिषद स्तरावर सुरु करण्यात येत आहे असेही पत्रात म्हटले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Y4hRh1
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments