मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये विविध पदांवर भरती

Mumbai Port trust : मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अंतर्गत येणाऱ्या विविध विभागामध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर हे अर्ज पाठविणे गरजेचे आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या प्रशासकीय विभागात एकूण ४२ जागा भरण्यासाठी येणार असून विविध पदांनुसार उमेदवाराची शैक्षणिक आर्हता आणि पगार वेगळा असणार आहे. या भरती अंतर्गत पदवीधर प्रशिक्षणार्थी (यांत्रिक अभियांत्रिकी/ विद्युत अभियांत्रिकी), तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी (यांत्रिक अभियांत्रिकी/ विद्युत अभियांत्रिकी), संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक आणि उप मुख्य यांत्रिकी अभियंता या पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. पदवीधर प्रशिक्षणार्थी (यांत्रिक अभियांत्रिकी) च्या दोन जागा भरण्यात येणार आहेत. तर पदवीधर प्रशिक्षणार्थी (विद्युत अभियांत्रिकी) पदाच्या ३ जागा भरण्यात येणार आहे. यासाठी मॅकेनिकल, इलेक्ट्रॉनिक मॅकेनिकलमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे गरजेचे आहे. यासाठी ९ हजार पर्यंत पगार देण्यात येणार आहे. तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी (यांत्रिक अभियांत्रिकी) आणि तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी (विद्युत अभियांत्रिकी) पदाच्या प्रत्येकी ३ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी मॅकेनिकल, इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा असणे गरजेचे आहे. या पदासाठी ८ हजार पर्यंत पगार देण्यात येईल. या प्रशिक्षणासाठी पात्र होण्यासाठी उमेदवाराचे वय १४ वर्षांपेक्षा कमी नसावे आणि १८ वर्षांपेक्षा अधिक नसावे. १८ वर्षांपेक्षा कमी वय असल्याने त्यांच्या पालकांनी करारावर स्वाक्षरी करणे गरजेचे आहे. कोणत्याही संस्थेत अप्रेंटिस १९६१ अंतर्गत ट्रेनिंग घेतलेल्यांना या प्रशिक्षणाची गरज नसेल. अनुसूचित जाती, जमाती आणि आर्थिक मागास वर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार सवलत मिळेल. संस्थेच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात अधिकृत नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २९ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. अर्जासोबत शंभर रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. याचे बॅंक डिटेल्स नोटिफिकेशनमध्ये देण्यात आले आहेत. शारीरिक अपंगत्व असलेल्या व्यक्तीकडून अर्ज शुल्क घेतले जाणार नाही.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jkNZ6Y
via IFTTT

Post a Comment

0 Comments