Also visit www.atgnews.com
मुंबईच्या महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये विविध पदांची भरती, ३१ ऑगस्टपर्यंत करा अर्ज
Maharashtra National Law University : मुंबईतील महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमधील प्रशासकीय विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे. या विविध पदांनुसार शैक्षणिक पात्रता, पगार देखील वेगळा असणार आहे. महाराष्ट्र नॅशल लॉ युनिव्हर्सिटीच्या वेबसाइटवर यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यासाठी अर्ज नमुना देण्यात आला असून त्यानुसार ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज पाठवायचा आहे. कोणत्या पदांची भरती? महाराष्ट्र लॉ युनिव्हर्सिटी अंतर्गत एकूण १९ जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये प्राध्यापक, सहयोग प्रक्रिया, सहायक प्राध्यापक आणि संशोधन सहायक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अनुसूचित जाती, जमाती आणि आर्थिक मागास वर्गासाठी सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. शैक्षणिक पात्रता सहायक प्राध्यापक आणि प्राध्यापक पदाच्या थेट निवडीसाठी उमेदवाराकडे पीएचडी असणे गरजेचे आहे. तसेच यूजीसीने दिलेले शैक्षणिक आणि संशोधनाचे निकष उमेदवाराने पूर्ण केलेले असावे. निवड झालेल्या उमेदवारांना वर्गात विद्यार्थ्यांची शिकवणी आणि विद्यापीठाने दिलेल्या तारीख आणि वेळेत प्रेझेंटेशन करावे लागणार आहे. वयोमर्यादा यासंदर्भातील सर्व सूचना इंग्रजी भाषेतून देण्यात येणार आहेत. उमेदवाराचे वय ६० पेक्षा अधिक नसावे. रिक्त जागांची संख्या ही विषयानुसार बदलणार आहे. या रिक्त जागा भरायच्या की नाही याचा अधिकार विद्यापीठाकडे राखीव आहे. कुठे पाठवाल अर्ज? इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज दिलेल्या नमुन्यानुसार भरुन recruitment2021@mnlumumbai.edu.in या ईमेल आयडीवर पाठवायचा आहे. तसेच अर्जाची प्रत कुलसचिव, महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ मुंबई, पोस्ट बॉक्स क्र. ८४०१, पोवई, मुंबई, पिनकोड- ४०००७६ या पत्त्यावर पाठवायची आहे. ३१ ऑगस्टपर्यंत संस्थेकडे आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jmpxCf
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments