विद्यार्थ्यांसाठी पुणे विद्यापीठाचे रोजगाराभिमुख नवे अभ्यासक्रम

डॉ. नितीन करमळकर सावित्रीबाई फुले व संलग्न महाविद्यालयांमध्ये सध्या ३०० पेक्षा अधिक विविध पदवी, पदविका, पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालविले जात आहेत. यामध्ये यंदा २५ नवीन अभ्यासक्रमांची भर घालण्यात आली आहे. विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, मानवविज्ञान आणि आंतरविद्याशाखीय अभ्यास या चार विद्याशाखांतर्गत हे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञातील प्रगतीमुळे दर काही वर्षांनी उद्योगक्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. त्यानुसार नवे तंत्रज्ञान आत्मसात करणारे मनुष्यबळ उपलब्ध होणे गरजेचे आहे. पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांसह विद्यार्थ्यांना हे नवे तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. त्यामुळेच अनेक नवे अभ्यासक्रम या बदलत्या काळानुसार सुरू करण्यात आले आहेत. येत्या काळात विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, रोबोटिक्स या विषयांना मोठया प्रमाणात महत्त्व प्राप्त होणार आहे. विद्यार्थ्यांना या विषयातील सखोल ज्ञान मिळण्याच्या दृष्टिकोनातून या विषयांमध्ये पदवी अभ्यासक्रम सुरू केला आहे. आंतरविद्याशाखीय अभ्यासामध्ये 'माउंटेनिअरिंग अँड अलाइड स्पोर्ट्स' या पदविका; तसेच प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. या कोर्समुळे एका वेगळ्या व साहसी क्षेत्रात अभ्यास करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रत्यक्ष कामाचा अनुभव कसा मिळेल, याचाही विचार अभ्यासक्रमाची निर्मिती करताना केला जातो. त्यासाठी देशातील नामांकित उद्योग, खासगी कंपन्यांसोबतच करारदेखील करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमांबाबत सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना पुणे विद्यापीठाच्या वेबसाइटवर मिळेल. विज्ञान व तंत्रज्ञान - एमई : ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन, आयओटी अँड सेन्सर सिस्टीम, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, प्रॉडक्शन अँड इंडस्ट्रियल. - बीई : आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड मशिन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज, कम्प्युटर सायन्स अँड डिझाइन - बीएसस्सी इन थ्रीडी अनिमेशन अँड व्हिएफएक्स .... वाणिज्य व व्यवस्थापन एमबीए : सर्व्हिस मॅनेजमेंट, सस्टेनॅबिलिटी मॅनेजमेंट, डिजिटल मार्केटिंग, फिंटेच, प्रोजेक्ट मॅनेजमेंट .... मानवविज्ञान पीजी डिप्लोमा : डिफेन्स टेक्नॉलॉजी, अंडरवॉटर डोमेन अवेअरनेस फ्रेमवर्क, इकॉनॉमिक्स जर्नालिझम. सर्टिफिकेट कोर्स : रिस्क मॅनेजमेंट अँड इन्शुरन्स, एनव्हार्यन्मेंटल इकॉनॉमिक्स अँड पॉलिसीज .... आंतरविद्याशाखीय अभ्यास डिप्लोमा : माउंटेनिअरिंग अँड अलाइड स्पोर्ट्स सर्टिफिकेट कोर्स - माउंटेनिअरिंग अँड अलाइड स्पोर्ट्स (लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आहेत.)


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/37kPGeW
via IFTTT

Post a Comment

0 Comments