BEL Recruitment 2021: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये ५०० पदांची भरती, १५ ऑगस्टपर्यंत करा अर्ज

BEL : इंजिनीअरिंगमध्ये नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बाातमी आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये () इंजिनीअरची एकूण ५०० पदं भरली जाणार आहेत. ट्रेनी इंजिनीअरच्या ३०८ आणि प्रोजेक्ट इंजिनीअरच्या २०३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ट्रेनी किंवा प्रोजेक्ट इंजिनीअर पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी बीईएलच्या अधिकृत वेबसाइट https://ift.tt/3k04bKe वर जाऊन ऑनलाइन अर्ज करु शकता. १५ ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, एक नवरत्न कंपनी आणि संरक्षण मंत्रालयाअंतर्गत भारतातील प्रसिद्ध कंपनी आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदावारंना २ वर्षांच्या नियुक्तीवर ठेवले जाणार आहे. प्रोजेक्टची आवश्यकता आणि प्रदर्शनाच्या आधारे हा कालावधी २ वर्षांपर्यत (अधिकतर २ वर्षांचा कालावधी) वाढवले जाईल. अर्ज भरताना त्यामध्ये कोणता गोंधळ असू नये. अन्यथा अर्ज रिजेक्ट केला जाईल. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, एक नवरत्न कंपनी आणि संरक्षण मंत्रालयाअंतर्गत प्रोजेक्ट इंजिनीअर्सना २ वर्षांसाठी नियुक्त केले जाईल. त्यानंतर प्रोजेक्टची आवश्यकता पाहून परफॉर्मन्सच्या आधारे हा कालावधी ४ वर्षांपर्यंत वाढविला जाऊ शकतो. ट्रेनी इंजिनीअर्सना एक वर्षाच्याा सुरुवातीच्या कालावधीसाठी नियुक्त केले जाईल. त्यानंतर प्रोजेक्टची आवश्यकता पाहून व्यक्तीगत परफॉर्मन्स पाहून हा कालावधी २ वर्षांसाठी वाढवला जाऊ शकतो. उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा. त्यानंतर अर्ज भरा. अर्जामध्ये काही गडबड आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल. अशी होईल उमेदवाराची निवड ट्रेनी आणि प्रोजेक्ट इंजिनीअर पदांसाठी उमेदवारांची निवड ही बीई आण बीटेकमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे होईल. या गुणांना ७५ टक्के वेटेज असेल. तर प्रत्यक्ष मुलाखत आणि प्रासंगित कार्यानुभव याला उर्वरित गुण असतील. भरतीसंदर्भातील सर्व माहिती उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर मिळू शकेल. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jtYgxX
via IFTTT

Post a Comment

0 Comments