Also visit www.atgnews.com
सीजीएल टियर १ परीक्षा १३ ऑगस्टपासून, परीक्षा केंद्रावर 'हे' नियम पाळावे लागणार
SSC 2020: कर्मचारी निवड आयोग (SSC)तर्फे २०२० संदर्भात महत्वाची बातमी आहे. ही परीक्षा १३ ऑगस्ट २०२१ पासून सुरु होणार आहे. देशभरातील निर्धारित केंद्रांवर १३ ते २४ ऑगस्ट दरम्यान ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी साधारण १९ लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आयोगातर्फे करोना प्रोटोकॉल अंतर्गत परीक्षा होणार आहे. उमेदवारांसाठी मार्गदर्शक सूचना परीक्षेत बसलेल्या सर्व उमेदवारांना फेस मास्क घालणे बंधनकारक असेल. परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर उमेदवारांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागतील. दोन उमेदवारांमध्ये ६ फूट अंतर असणे गरजेचे आहे. मुख्य गेटवर तसेच परीक्षा केंद्राच्या आत हँड सॅनिटायझेशनची सुविधा उपलब्ध असेल. हॉल तिकिट, फोटो आयडी परीक्षाकेंद्रावर दाखवण्यापूर्वी थर्मो गनने उमेदवारांच्या शरीराचे तापमान तपासले जाईल. परीक्षा अधिकारी उमेदवाराकडील महत्वाच्या कागदपत्रांची पडताळणी करतील त्यानंतर उमेदवार रजिस्ट्रेशन डेस्ककडे जाऊ शकतो. उमेदवार स्वत:च्या सुरक्षिततेसाठी हॅंडग्लोजचा उपयोग करु शकतात. रजिस्ट्रेशन डेस्कवर उमेदवाराचा फोटो काढला जाईल. आंगठ्याची निशाणी घेतली जाणार नाही. इथे उमेदवारांना सीट नंबर दिला जाईल. करोनाच्या पार्श्वभूमीवर मेन गेटवर शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यासाठी उमेदवारांना गेट बंद होण्यापूर्वी परीक्षा स्थळी पोहोचणे गरजेचे आहे. कोणत्याही परिस्थितीत किंवा कोणत्याही कारणास्तव निर्धारित वेळेनंतर प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यावी. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख २९ डिसेंबर ते ३१ जानेवारी पर्यंत निश्चित करण्यात आली होती. आधीच्या वेळापत्रकानुसार, टियर १ परीक्षा २९ मे पासून होणार होती. करोनाच्या वाढत्या केसेसमुळे ही परीक्षा स्थगित करण्यात आली. या परीक्षेच्या माध्यमातून एकूण ७०३५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. सीबीटी माध्यमातून होणार परीक्षा एसएससी द्वारे सीजीएल टियर १ परीक्षेचे आयोजन सीबीटी ( कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट) माध्यमातून केले जाणार आहे. परीक्षेसाठी एक तासांचा वेळ दिला जाणार आहे. परीक्षेमध्ये जनरल इंटेलीजन्स अॅण्ड रिजनिंग, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटीव्ह अॅप्टीट्यूड आणि इंग्रजी कॉम्प्रीहेंशन विषयाचे २५-२५ प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्नाला २ गुण आहेत. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.५० गुणांचे निगेटीव्ह मार्कींग आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CJLYKA
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments