'दहावी-बारावीच्या परीक्षेचा आराखडा तयार करा'

म. टा. प्रतिनिधी, पुणे 'करोना प्रादुर्भावाचा अंदाज घेऊन पुढील वर्षी होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा पद्धतीबद्दल कृती आराखडा तयार करा,' अशा सूचना शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बुधवारी केल्या. कडू यांच्या अध्यक्षतेखाली मार्च-एप्रिल २०२२ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा कार्यपद्धती ठरविण्याबाबत महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात बैठक पार पडली. या वेळी माध्यमिक व उच्च माध्यमिकचे शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप, प्राथमिक शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर, राज्य मंडळाचे सचिव अशोक भोसले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. करोनाचा संसर्ग असतांना परीक्षा कशा प्रकारे घेण्यात येईल. त्याचप्रमाणे करोना संसर्ग नसेल, तर परीक्षा कशा प्रकारे घेण्यात येईल, याबाबत कृती आराखडा तयार करण्यात यावा. दहावी आणि बारावीच्या परीक्षेबाबत विद्यार्थी व पालक यांना लवकरात लवकर कळविल्यास परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासाची तयारी करण्यास सोयीचे होईल. राज्यासाठी केरळच्या धर्तीवर एक नवीन शैक्षणिक 'चॅनेल' तयार करण्याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे प्रस्ताव सादर करून पाठपुरावा करणार आहे, असे कडू यांनी सांगितले. प्रशासनाची शिक्षणसंस्थांशी हातमिळवणी 'आमच्या शिक्षण विभागाने शिक्षणसंस्थांशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे प्रशासन संस्थेच्या बाजूने उभे राहते. राज्यातील शाळा मोठ्या नेत्यांच्या, राजकीय नेत्यांच्या असल्याने, त्यावर कारवाई होत नाही. अधिकाऱ्यांना शुल्क वसुली करणाऱ्या शाळांवर कारवाई करायला भीती वाटते. अधिकाऱ्यांची कार्यक्षमता संपलीय, त्यामुळे कायदा बदलण्याचा विचार करतोय. शिक्षण संस्थांची दरोडेखोरी आणि व्यावसायिक म्हणून भूमिका आहे. त्यामुळे वेळ आली, तर सरकारच्या विरोधात लढू,' असा इशारा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CK4PoD
via IFTTT

Post a Comment

0 Comments