नीट एमडीएस काऊन्सेलिंग २० ऑगस्ट ते १० ऑक्टोबर या कालावधीत

नीट-एमडीएस ( ( MDS 2021 Counselling) प्रवेशांसाठी काऊन्सेलिंग २० ऑगस्ट ते १० ऑक्टोबर २०२१ पर्यंत होणार आहे. परीक्षेचे आयोजन मागील वर्षी झाले होते. केंद्र सरकारने उच्च न्यायालयाला ही माहिती दिली. केंद्र सरकारच्या या माहितीला रेकॉर्डवर घेत न्या. डी. वाय चंद्रचूड आणि न्या. एम. आर. शाह यांनी या प्रकरण निकाल काढले. याचिकेवरील सुनावणीच्या सुरुवातीला याचिकाकर्त्यांच्या वतीने अधिवक्ता विकास सिंह यांनी माहिती दिली. ते म्हणाले की केंद्र सरकारने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटल्यानुसार २० ऑगस्ट ते १० ऑक्टोबर २०२१ पर्यंत काऊन्सेलिंग करणार आहे. परीक्षेच्या आयोजनानंतर सात महिन्यानंतर काऊन्सेलिंग कार्यक्रम जारी केला गेला आहे. परीक्षेच्या निकालाची घोषणा ३१ डिसेंबर २०२० रोजी केली होती. बॅचलर इन डेंटल सर्जरी (BDS)ची डिग्री घेतलेले सुमारे ३० हजार उमेदवार देशभरात एमडीएसच्या ६,५०० हून अधिक जागांवरील प्रवेशांसाठी मागील वर्षी १६ डिसेंबर रोजी आयोजित राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET)- MDS (मास्टर इन डेंटल सर्जरी) मध्ये सहभागी झाले होते. डेंटल ग्रॅज्युएटच्या विद्यार्थ्यांनी नीट एमडीएस काऊन्सेलिंगसंबंधी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. काऊन्सेलिंगची तारीख लवकर जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली होती. समुपदेशन फेरीला विलंब झाल्याच्या कारणावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारलेही होते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ABpsBJ
via IFTTT

Post a Comment

0 Comments