'या' विद्यापीठात यूजी कोर्सेच्या ७० हजार जागा रिक्त; पहिल्याच दिवशी आले ६५ हजार अर्ज

Delhi : देशभरातील विविध विद्यापीठ आणि कॉलेजांमध्ये यूजी, पीजी कोर्सेससाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. दिल्ली विद्यापीठातर्फे यूजी कोर्सेससाठी सोमवारी रात्री ८ वाजता अर्जाचे पोर्टल सुरु करण्यात आले. त्यानंतर विद्यापीठाच्या प्रवेश वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार मंगळवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ६४ हजार ९९४ अर्जदारांनी विविध कोर्सेससाठी नोंदणी केली होती. यूजी कोर्सेससाठी अर्ज करण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२१ ही शेवटची तारीख आहे. पीजी कोर्ससाठी नोंदणी सुरु पोस्टग्रॅज्युएशन (PG) कोर्सेससाठी विद्यापीठातर्फे मंगळवारी संध्याकाळी ५ वाजता साधारण २० हजार जागांसाठी ७६ हजार १६० नोंदणी झाली. तर एमफील/पीएचडी साठी १० हजार ८३५ अर्ज आले आहेत. पीजी कोर्सच्या अर्ज प्रक्रियेला सुरुवात MPhil/PhD आणि PG कोर्सेससाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २६ जुलैला सुरु झाली होती. तर या कोर्सेसना अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२१ आहे. यूजी कोर्सेसची पहिली कट ऑफ लिस्ट केव्हा येणार? सीबीएसई, आयएससी बोर्डांनी आपले निकाल जाहीर केले आहेत. काही राज्यांनी आपले निकाल अद्याप जाहीर केले नाहीत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यूजी कोर्सेससाठी पहिली कट ऑफ लिस्टची घोषणा ७ ते १० सप्टेंबर दरम्यान करण्यात येईल. विद्यापीठातर्फे गुण अपडेट करण्यासाठी नंतर विंडो खुली केली जाणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jt6Mxb
via IFTTT

Post a Comment

0 Comments