Also visit www.atgnews.com
डिजिटल विभाजन आणि शुल्क वाढ रोखण्यााठी TISS चे विद्यार्थी आग्रही
TISS Students Demands: (TISS) च्या पाच कॅम्पसमधील विद्यार्थ्यांनी संस्थेच्या प्रशासनाकडे अर्ज करुन काही आग्रही मागण्या केल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शुल्क कमी करणे, विद्यार्थी संघाची निवडणूक आणि करोनामुळे गेल्या वर्षापासून समोर आलेले रोखणे या मागण्यांचा यामध्ये समावेश आहे. संस्थेच्या मुंबई, हैदराबाद, गुवाहाटी, चेन्नई आणि तुळजापूर येथील नऊ विद्यार्थी गटांनी तसेच १७ पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या वर्ग प्रतिनिधींनी यासंदर्भात संयुक्त निवेदन जाहीर केले आहे. त्यानुसार टीस प्रशासनाला शुल्क भरण्याची अंतिम मुदत वाढवण्यास भाग पाडणे, पात्र विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती वितरित करण्यासह इतर तातडीचे प्रश्न मांडण्यात आले आहेत. करोना काळात ऑफलाइन वर्ग बंद होऊन ऑनलाइन शिकवणी सुरु झाली. या अभूतपूर्व काळामध्ये विद्यार्थ्यांना संपूर्ण वर्षभर ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागले. पण या काळात डिजिटल विभाजन वाढत गेल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. यामुळे सर्व विद्यार्थ्यांवर आणि विशेषत: समाजातील मागास वर्गातील विद्यार्थ्यांवरील शारीरिक आणि मानसिक त्रास वाढल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. इंटरनेट सुविधांचा अभाव, घरगुती अडचणींमुळे या वर्गाला ऑनलाइन शिक्षण घेताना त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची बाजू विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणात अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकांकडे चांगली इंटरनेट सुविधा नसते तर बऱ्याच जणांच्या घरी अनुकूल वातावरणही नसते. अशा विद्यार्थ्यांना कॅम्पसमधील लायब्ररी आणि हॉस्टेलचा वापर करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे त्यांना ऑफलाइन क्लाससाठी कॅम्पस पुन्हा उघडण्यासाठी पावले उचलली पाहिजेत अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2VoIxIk
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments