खासगी आणि शासकीय आयटीआय प्रवेशांचे वेळापत्रक जाहीर

राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत (Craftsman Training Scheme) ऑगस्ट २०२१ सत्रातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (Centralized Online Admission Process) पध्दतीने करण्यात येत आहेत. प्रवेशाची सविस्तर माहितीपुस्तिका १५ जुलैपासून प्रवेश संकेत स्थळावर Download Section मध्ये Pdf स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात येत आहे. राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना प्रवेश प्रक्रीयेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक शासकीय व खाजगी औ.प्र. संस्थांमध्ये १५ जुलै ते २१ ऑगस्ट, २०२१ दरम्यान रोज सकाळी १० ते ११ या वेळेत नि:शुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. सदर सुविधेचा सर्व उमेदवारांनी लाभ घ्यावा. सर्व सुट्टी‌च्या दिवशी देखील मार्गदर्शन सत्र व प्रवेश प्रक्रीये संबंधी कार्यवाही सुरू राहील. प्रवेशांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे - - ऑनलाइन प्रवेश अर्ज करणे - १५ जुलै २०२१ ते ३१ ऑगस्ट २०२१ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) - पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे - १५ जुलै २०२१ ते ३१ ऑगस्ट २०२१ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) - प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे - २ सप्टेंबर २०२१ (सकाळी ११ वाजता) - गुणवत्ता यादी बाबत हरकती नोंदविणे व प्रवेश अर्जातील माहितीत बदल करणे - २ सप्टेंबर २०२१ ते ३ सप्टेंबर २०२१ ( सायंकाळी ५ वाजेपर्यंत) - अंतिम गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे - ४ सप्टेंबर २०२१ (सायंकाळी ५ वाजता) - पहिल्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसायनिहाय निवडयादी संकेतस्थळावर प्रसिध्द करणे व उमेदवारांना SMS व्दारे कळविणे - ६ सप्टेंबर २०२१ (सायंकाळी ५ वाजता) - पहिल्या फेरीनुसार प्रवेश निश्चिती करणे - प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करणे - ७ सप्टेंबर २०२१ ते ११ सप्टेंबर २०२१ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) दुसरी प्रवेश फेरी - ७ सप्टेंबर २०२१ ते १२ सप्टेंबर २०२१ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) दुसरी गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे - १५ सप्टेंबर २०२१ (सायंकाळी ५ वाजता) दुसऱ्या यादीनुसार प्रवेश निश्चिती - १६ सप्टेंबर २०२१ ते २० सप्टेंबर २०२१ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी Online पध्दतीने व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे - १६ सप्टेंबर २०२१ ते २१ सप्टेंबर २०२१ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) तिसरी गुणवत्ता यादी - २४ सप्टेंबर २०२१ (सायंकाळी ५ वाजता) तिसऱ्या यादीनुसार प्रवेश निश्चिती - २५ सप्टेंबर २०२१ ते २८ सप्टेंबर २०२१ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी Online पध्दतीने व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे - १६ सप्टेंबर २०२१ ते २१ सप्टेंबर २०२१ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) चौथी फेरी - २५ सप्टेंबर २०२१ ते २९ सप्टेंबर २०२१ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) चौथी गुणवत्ता यादी - ३ ऑक्टोबर २०२१ (सायंकाळी ५ वाजता) चौथ्या यादीनुसार प्रवेश निश्चिती - ४ ऑक्टोबर २०२१ ते ७ ऑक्टोबर २०२१ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) संस्थास्तरीय समुपदेशन फेरीच्या रिक्त जागांचा तपशील - ९ ऑक्टोबर २०२१ (सायंकाळी ५ वाजता) - समुपदेशन फेरीची गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे - १३ ऑक्टोबर २०२१ (सायंकाळी ५ वाजता) - समुपदेशन फेरीतील प्रवेश - १४ ते १७ ऑक्टोबर २०२१


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/37yOlS3
via IFTTT

Post a Comment

0 Comments