'समग्र शिक्षण योजना २.०' ला मंजूरी, आता सरकारी शाळांमध्ये होणार 'हे' बदल

Comprehensive : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी ' २.०' ला मंजूरी देण्यात आली आहे. देशभरात राबविल्या जाणाऱ्या या योजनेसाठी साधारण २.९४ लाख कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भातील माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत समग्र शिक्षण योजना १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढविण्यास मंजूरी देण्यात आली. समग्र शिक्षण योजना २.० साठी २.९४ लाख कोटी खर्च केले जातील. या रक्कमेत केंद्राचा हिस्सा १.८५ लाख कोटींचा असेल अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. समग्र शिक्षण योजना २.० अंतर्गत सरकारी शाळा आणि सरकारी सहायता प्राप्त ११.६ लाख शाळा, १५.६ कोटी विद्यार्थी आणि ५७ लाख शिक्षकांना याचा फायदा होणार आहे. समग्र शिक्षण योजना २.० च्या माध्यमातून काही वर्षांमध्ये नियोजनबद्धरित्या शाळांमध्ये बाल वाटिका, स्मार्ट वर्ग, प्रशिक्षित शिक्षकांची व्यवस्था केली जाणार आहे. व्यावसायिक शिक्षण तसेच रचनात्मक शिक्षण मुल्यांचा विकास केला जाणार आहे. समग्र शिक्षण योजनेच्या विस्ताराअंतर्गत शाळांमध्ये सर्वसमावेशी आणि आनंदी वातावरण निर्माण करण्यावर जोर दिला जाणार आहे. यामध्ये विविध पार्श्वभूमी, बहुभाषी गरजा आणि मुलांचा विभिन्न शैक्षणिक क्षमतांची काळजी घेतली जाणार आहे. याअंतर्गत नियोजनबद्धरित्या बाल वाटिका स्थापन करण्यासोबत शिक्षक पाठ्य सामग्री (टीएलएम) ची तयारी केली जाईल. तसेच स्मार्ट वर्गाची व्यवस्था केली जाईल असे केंद्रीय शिक्षणमंत्री यावेळी म्हणाले. समग्र शिक्षण अभियानाचा आवाका वाढविताना विशेष सहायतेची गरज असलेल्या मुलींसाठी वेगळ्या देयकाची व्यवस्था, शिकण्याच्या प्रक्रियेवर देखरेख, शिक्षकांच्या क्षमता विकास आणि प्रशिक्षण कामावर विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यावेळी म्हणाले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Ae2pMW
via IFTTT

Post a Comment

0 Comments