Also visit www.atgnews.com
UGC Alert: यूजीसीकडून २४ बनावट विद्यापीठांची यादी जाहीर
in India List: बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये प्रवेश (University admission 2021) घेण्याची स्पर्धा सुरु आहे. पण घाई घाईत कुठेही प्रवेश घेण्यापूर्वी ही बातमी काळजीपूर्वक वाचा. चुकीच्या ठिकाणी प्रवेश घेऊन आपली शैक्षणिक वर्षे वाया घालवू नका. कारण देशात अनेक बनावट विद्यापीठांद्वारे शिक्षणाचा बाजार सुरु आहे. ज्या शिक्षणसंस्थाना मान्यताच नाही अशा विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतलात तर तुमच्या पदवीला अर्थ राहणार नाही. विद्यापीठ अनुदान आयोगाने () अशा २४ बनावट विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. यातील बहुतेक विद्यापीठं ही उत्तर प्रदेशात आहेत. त्या सर्व २४ विद्यापीठांची नावे पुढे देण्यात आली आहेत. तत्पुर्वी कोणत्या विद्यापीठांची पदवी वैध असते हे समजून घेऊया. विद्यापीठ अनुदान आयोग अधिनियम, १९५६ (UGC कायदा १९५६) च्या कलम २२ (१) नुसार अशी विद्यापीठे जी केंद्रीय किंवा राज्य कायद्यांतर्गत स्थापन केली गेली आहेत. किंवा जी यूजीसी कायदा कलम ३ अंतर्गत स्थापन केलेली डीम्ड विद्यापीठ आहेत. किंवा ज्या संस्थांना संसदीय अधिनियमानुसार पदवी प्रदान करण्याचे विशेष अधिकार देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त, कोणतीही संस्था विद्यापीठ सुरु करु शकत नाही किंवा पदवी देऊ शकत नाही. UGC Fake Universities List: २४ बनावट विद्यापीठांची यादी खाली नमूद केलेल्या कोणत्याही संस्थांना UGC ने मान्यता दिलेली नाही. या सर्व विद्यापीठांनी यूजीसी कायदा १९५६ चे उल्लंघन केले आहे. संपूर्ण यादी पहा- दिल्लीत ७ बनावट विद्यापीठे कमर्शियल युनिव्हर्सिटी लिमिटेड, दर्यागंज संयुक्त राष्ट्र विद्यापीठ व्यावसायिक विद्यापीठ एडीआर सेंट्रिक ज्युरीडिकल युनिव्हर्सिटी, एडीआर हाऊस, २५ राजेंद्र प्लेस भारतीय विज्ञान आणि इंजिनीअरिंग संस्था विश्वकर्मा मुक्त विद्यापीठ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट आध्यात्मिक विद्यापीठ, रोहिणी कर्नाटकमध्ये १- बडागानवी सरकार वर्ल्ड ओपन युनिव्हर्सिटी एज्युकेशन सोसायटी केरळमध्ये १- सेंट जॉन युनिव्हर्सिटी, कृष्णतम महाराष्ट्रामध्ये १- राजा अरबी विद्यापीठ, नागपूर पश्चिम बंगालमध्ये २ बनावट विद्यापीठे इंडियन इंस्टीट्यूट ऑफ अल्टरनेटिव मेडिसिन, कोलकाता इंस्टीट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन अॅण्ड रिसर्च, कोलकाता उत्तर प्रदेशात ८ बनावट विद्यापीठे वारणसेय संस्कृत विद्यापीठ, वाराणसी महिला ग्राम विद्यापीठ (Womens' University), प्रयागराज गांधी हिंदी विद्यापीठ, प्रयागराज नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स होमिओपॅथी, कानपूर नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यापीठ (मुक्त विद्यापीठ), अलीगढ उत्तर प्रदेश विद्यापीठ, मथुरा महाराणा प्रताप शिक्षण निकेतन विद्यापीठ, प्रतापगढ इंद्रप्रस्थ शिक्षण परिषद, नोएडा फेज -२ ओडिशामध्ये २ बनावट विद्यापीठे नवभारत शिक्षण परिषद, राउरकेला उत्तर ओडिसा कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ, मयूरभंज पुद्दुचेरी मध्ये १- श्री बोधी अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन आंध्र प्रदेशमध्ये १- क्राइस्ट न्यूज टेस्टामेंट डीम्ड विद्यापीठ, गुंटूर
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CGPVPW
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments