मुंबई विद्यापीठात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; 'त्या' ई-मेलने खळबळ

bomb threat : मुंबई विद्यापीठात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी आल्याने एकच घबराट उडाली आहे. एका ई-मेलवरून ही धमकी देण्यात आली आहे. यासंबंधी विद्यापीठ प्रशासनाने शुक्रवारी १३ ऑगस्ट रोजी बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांच्या मेलवर गुरुवारी १२ ऑगस्ट रोजी हा मेल धडकला. विद्यापीठाच्या ईमेल आयडीवरून मार्च २०२१ परीक्षेच्या निकालाचे कामकाज सुरू असताना हा मेल निदर्शनास आला. 'BSC, B.com, BA अभ्यासक्रमाच्या ६ सेमिस्टरचे निकाल लवकर लावले नाही तर विद्यापीठात स्फोट घडवून आणला जाईल,' अशी धमकी आरोपीने दिली आहे. हा मेल पाठवणारा विद्यार्थी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याची मानसिक स्थिती बरोबर नसल्याचे उघड झाले आहे. पुढील तपास मुंबई सायबर पोलीस करत आहेत. मात्र, रविवारी होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या मेलमुळे विद्यापीठ प्रशासनासह पोलीसही सावध झाले आहेत. दरम्यान, विद्यापीठ प्रशासनाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 'हा धमकीचा मेल गुरुवारील कंट्रोलर यांच्या ईमेलवर आला. यासंबंधी प्रशासनाने शुक्रवारी बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तपास सुरू आहे,' अशी माहिती विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी विनोद माळाळे यांनी दिली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iHFrbk
via IFTTT

Post a Comment

0 Comments