Also visit www.atgnews.com
राज्यातील पोलीस भरतीसंबंधी महत्वाचे अपडेट, जाणून घ्या
Maharashtra 2019: महाराष्ट्र् राज्य मधील विविध पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची माहिती आहे. अर्ज करताना अनेक उमेदवारांनी पासवर्ड न बदलणे, ईमेल आयडी विसरणे, प्रवर्ग न निवडणे अशा केसेस समोर आल्या आहेत. यासंदर्भातील उमेदवारांच्या तक्रारी कार्यालयात आल्या आहेत. या उमेदवारांसाठी कार्यालयातर्फे अपडेट माहिती जाहीर करण्यात आली आहे. ३० जुलै रोजी जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार सर्व उमेदवारांना आपला पासवर्ड बदलणे अनिवार्य आहे. अन्यथा पुढील भरती प्रक्रियेत ते आपल्या अर्जाची लिंक उघडू शकणार नाहीत. ईसीबी उमेदवारांना अराखील (खुला) किंवा 'EWS' यापैकी एक पर्याय देणे गरजेचे आहे. तसेच काही उमेदवारांनी आपला ईमेल आयडी विसरल्याच्या तक्रारी केल्या आहेत. अशा उमेदवारांना आपला ईमेल आयडी वेबसाइटवर जाऊन आपला ईमेल आयटी रिसेट करावा लागणार आहे. यासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट www.mahapolice.gov.in वर जाऊन पोलीस कॉर्नर या पर्यायावर क्लिक करुन २०१९ हा पर्याय निवडावा. इथे तुम्हाला ईमेल आयडी आणि पासवर्ड यामध्ये बदल करता येणार आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस विभाग भरती २०१९ ही परीक्षा ऑनलाईन ऐवजी आता ऑफलाईन घेण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी हे बदल करणे गरजेचे आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2VQVSZZ
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments