Also visit www.atgnews.com
राज्यातील शाळांमध्ये १५ ऑगस्टला देशभक्तीपर कार्यक्रम, जाणून घ्या डिटेल्स
independence Day India 2021: यावर्षी देशभरात ७४ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येणार आहे. १५ ऑगस्ट हा राष्ट्रीय सण देशात दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सगळीकडे ऑनलाइन होत आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शैक्षणिक विभागाने १५ ऑगस्ट रोजी शाळांमध्ये घेण्यात येणाऱ्या ऑनलाइन कार्यक्रमांसंदर्भातील निर्देश जाहीर केले आहेत. सर्व विद्यार्थी आपापल्या घरी राहून या उपक्रमात सहभागी होऊ शकतात. शालेय विभागाने जाहीर केलेल्या पत्रकामध्ये यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. क्रांतीविरांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण विद्यार्थ्यांना व्हावी, त्यांच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने राज्यातील शाळांमध्ये पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवसभराच्या कार्यक्रमात वृक्षारोपण, आंतरशालेय, आंतर महाविद्यालय स्तरावर ऑनलाइन पद्धतीने वाद-विवाद स्पर्धा, प्रश्न मंजुषा/ देशभक्तीपर निबंध आणि कविता, चित्रकला स्पर्धा, देशभक्तीपर गीत गायन, वक्तृत्व स्पर्धा, स्वातंत्र्य संग्रामाच्या दुर्मिळ छायाचित्रांचे संकलन असे विविध उपक्रम ऑनलाइन/ऑफलाइन उपक्रम घेण्याची सूचना देण्यात आली आहे. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा, एकपात्री अभिनय (वेशभूषासह), राष्ट्रगान (वेशभूषासह). चित्रकला या सप्रधा होणार आहेत. यासाठी माझा प्रिय भारत देश, मी तिरंगा बोलतोय, माझ्या स्वप्नातील भारत, भारतीय ध्वज/ माझ्या शाळेतील ध्वजारोहण कार्यक्रम, स्वातंत्र्य लढ्यातील एका थोर सेनानीची वेशभूषा, स्वातंत्र्य लढ्यातील कविता हे विषय आहेत. सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धा, स्वरचित कविता लेखन स्पर्धा, काव्यवाचन, देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा होणार आहेत. यासाठी अहिंसा आणि स्वातंत्र्यलढा, सन २०२५ मधील भारत, माझ्या नजरेतून माझा भारत, भारतीय स्वातंत्र्य लढा, स्वातंत्र्य आणि लहान थोरांचे बलिदान, स्वातंत्र्य चळवळीतील महात्मा गांधींचे योगदान आणि १५ ऑगस्ट १९४७ हे विषय देण्यात आले आहेत. तर नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी भारत एक महासत्ता, भारतीय म्हणून माझी जबाबदारी, माझ्या स्वातंत्र्य लढ्याचे रिअल हिरो, भारतीय स्वातंत्र्यलढा, स्वातंत्र्य आणि आपली कर्तव्य, चले जाव/ भारत छोडो चळवळ, ७५ वा स्वातंत्र्यदिन हे विषय देण्यात आले आहेत. या कार्यक्रमांचे आयोजन करुन त्याचे व्हिडीओ, फोटो आणि इतर साहित्य #स्वातंत्र्यदिन२०२१ आणि #independenceDayIndia2021 या हॅशटॅगसह अपलोड करावे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा विविध माध्यमांमध्ये शेअर करावे. प्रत्येक गटामध्ये वर्गनिहाय उत्कृष्ट विद्यार्थ्याची निवड केली जाणार आहे. निवड केलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागातर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे पालन करताना राज्य शासन तसेच केंद्राने दिलेल्या करोना प्रतिबंध नियमांचे पालन करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ser95b
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments