Also visit www.atgnews.com
'औषधनिर्माणा'त मोठी संधी
डॉ. मनोहर चासकर जन्माची चाहूल लागल्यापासून ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आयुष्यात आवश्यक घटकांपैकी एक म्हणजे औषध होय. मानवी जीवन - आरोग्य - औषधे या साखळीचे आणि औषध संशोधनाचे महत्त्व करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे संपूर्ण जगाला समजले आहे. करोनामुळे आरोग्य क्षेत्रातील फार्मसीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. त्या दृष्टीने औषधे; तसेच उपचार पद्धतींचाही विचार केला जात आहे. याचसोबत क्षेत्रात माहिती तंत्रज्ञान अर्थात आयटीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळे फार्मसी क्षेत्रसुद्धा विकासाच्या आणि नवनवीन आव्हानात्मक संशोधन सेवा, रोजगार आदींबाबत झपाट्याने अग्रेसर होत आहे. औषधांचे सेवन, योग्य वापर, मात्रा, परिणाम आदी प्रक्रियांची औषधे तयार होण्यापूर्वी, तयार करताना आणि बाजारात आल्यानंतर प्रक्रियेची सखोल माहिती तंत्रज्ञानाच्या साह्याने अभ्यासणे आणि त्यावर सुरक्षिततेच्या दृष्टीने बदल करून योग्य माहिती संशोधन आणि विकास, मानवीय चाचणी, नियामक संस्था आदी विभागांना कळविणे यामध्ये फार्मसी क्षेत्रातील विस्तार व तंत्रज्ञांना सर्वोत्तम संधी उपलब्ध होतील. औषधांच्या जागतिक बाजारपेठेचे मूल्य १.२ ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे. भारतीय बाजारपेठ तीन हजार ८४६ अब्ज रुपयांची आहे. सन २०२५ पर्यंत ही बाजारपेठ सात हजार अब्ज रुपयांची होईल, असे विविध संशोधकांचे भाकित आहे. भारत जागतिक पातळीवर, क्षेत्रातील व बायोटेक क्षेत्रातील तज्ज्ञ मनुष्यबळ पुरवण्यासाठी जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे योगदान देतो. फार्मसी क्षेत्रातील विविध संधी पुढीलप्रमाणे अ) फार्मास्युटिकल इंडस्टी - संशोधन आणि विकास : औषध शोध, फॉर्म्युलेशन अँड डेव्हलपमेंट, क्वालिटी कंट्रोल अँड क्वालिटी अॅश्युरन्स, बायोअॅनॅलेटिकल, बायोटेक्नॉलॉजी, फार्माकोलॉजी, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर. नवीन औषध शोध संशोधन, प्रक्रिया व विकास, फॉर्म्युलेशन अंड डेव्हलपमेंट, विश्लेषण आणि चाचणी, पायलट स्केल उत्पादन आदी हे क्षेत्र म्हणून अध्यक्ष, उपाध्यक्ष सहायक अशी बरीच पदे येतात. याचसोबत उपाध्यक्ष, सरव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, वरिष्ठ संशोधन वैज्ञानिक, संशोधन वैज्ञानिक, संशोधन वैज्ञानिक, प्रशिक्षणार्थी आदी पदे असतात. - मॅन्युफॅक्चरिंग व पॅकेजिंग : मॅन्युफॅक्चरिंग व पॅकेजिंग क्षेत्रात उत्पादन पर्यवेक्षक / अधिकारी, पीओ - वरिष्ठ पीओ, फॉर्म्युलेशन अँड प्रोसेस डेव्हलपमेंट डिपार्टमेंटही मोठ्या संधी देते. फार्माच्या या क्षेत्रात ज्या उद्योगांमध्ये बल्क औषधे, इंटरमीजिएट्स किंवा फॉर्म्युलेशन आणि डोसेज फॉर्म, रक्त आणि प्लाझ्मा उत्पादने, जैविक आणि जैवतंत्रज्ञान उत्पादने, पशुवैद्यकीय औषधे, सौंदर्यप्रसाधने, वैद्यकीय उपकरणे आणि मशिन, दंत उत्पादने, साबण, पर्फ्युमरी, न्यूट्रास्युटिकल. - विक्री आणि विपणन (सेल्स अँड मार्केटिंग) - उत्पादन व्यवस्थापन, प्रशिक्षण, मार्केट संशोधन : हा विभाग फार्मास्युटिकल विक्री कोणत्याही प्रक्रियेच्या उत्पादनापासून ते ग्राहकांच्या विक्रीच्या प्रक्रियेपर्यंत अगदीच वेगळी असते. सर्व विक्रींपैकी, फार्मास्युटिकल विक्री ही सर्वात फायदेशीर आणि चांगल्या पगाराची मानली जाते. व्हाइस प्रेसिडेंट, जनरल मॅनेजर अशी पदे उपलब्ध आहेत. नॅशनल सेल्स मॅनेजर, झोनल सेल्स मॅनेजर, रीजनल सेल्स मॅनेजर, एरिया सेल्स मॅनेजर / डिस्ट्रिक्ट सेल्स मॅनेजर, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह इत्यादी आणि फील्ड सेल्स ऑफिसर - कंट्री मॅनेजर - मॅनेजर - जीएम - व्हीपी, प्रॉडक्ट मॅनेजमेंट आदी पदांवर मोठी संधी असते. या क्षेत्रातील आणखी संधींबाबत पुढील भागांत पाहू या. (लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता आहेत.)
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3AFL9Ay
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments