Also visit www.atgnews.com
UPSC Calendar 2022: यूपीएससीच्या २०२२ मधील परीक्षांच्या तारखा जाहीर
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) पुढील शैक्षणिक सत्रासाठी यूपीएससी कॅलेंडर २०२२ जारी केले आहे. सीडीएस, एनडीए, आयईएस, सीआयएसएफ सारख्या विविध यूपीएससी परीक्षांना बसण्यास इच्छुक उमेदवारांनी वर जाऊन हे कॅलेंडर पाहावे . वर्ष २०२२ मधील परीक्षांना २० फेब्रुवारी २०२१ पासून सुरू होत आहे. पुढच्या वर्षी, यूपीएससी परीक्षा अभियांत्रिकी सेवा (प्राथमिक) परीक्षेपासून या परीक्षा सुरू होतील. यूपीएससी आरटी ही वर्षातली शेवटची परीक्षा असेल. यूपीएससी कॅलेंडर २०२२ नुसार, अभियांत्रिकी सेवा आणि भू वैज्ञानिक परीक्षा, दोन्ही एकाच दिवशी घेण्यात येणार आहेत. यूपीएससी कॅलेंडर २०२२ पुढीलप्रमाणे - परीक्षेचे नाव -- परीक्षेची तारीख अभियांत्रिकी सेवा (प्रारंभिक) परीक्षा, २०२२ / संयुक्त भू-वैज्ञानिक (प्रारंभिक) परीक्षा, २०२२ -- २० फेब्रुवारी, २०२२ CISF AC (EXE) LDCE-२०२२ -- १३ मार्च, २०२२ NDA आणि NA परीक्षा (I), २०२२/ CDS परीक्षा (I), २०२२ -- ४ एप्रिल २०२२ नागरी सेवा (पूर्व) परीक्षा, २०२२/ भारतीय वन सेवा (पूर्व) परीक्षा, २०२२ सीएस (पी) परीक्षा २०२२ -- ५ जून २०२२ IES/ISS परीक्षा, २०२२ -- २४ जून २०२२ संयुक्त भू-वैज्ञानिक (मुख्य) परीक्षा, २०२२ -- २५ जून २०२२ अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा - २६ जून २०२२ कंबाइंड मेडिकल सर्व्हिस परीक्षा २०२२ -- १७ जुलै २०२२ केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (ACs) परीक्षा, २०२२ -- ७ ऑगस्ट, २०२२ NDA आणि NA परीक्षा (II), २०२२/ CDS परीक्षा (II), २०२२ -- ४ सप्टेंबर २०२२ नागरी सेवा (मुख्य) परीक्षा, २०२२ -- १६ सप्टेंबर २०२२ भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा, २०२२ -- २० नोव्हेंबर २०२२ SO/स्टेनो (GD-B/GD-I) LDCE -- १० डिसेंबर २०२२ UPSC RT परीक्षा (राखीव) -- १८ डिसेंबर २०२२ यूपीएससी कॅलेंडर २०२२ च्या अधिकृत नोटीसमध्ये असे म्हटले आहे की, 'तत्कालीन परिस्थिती योग्य असेल तर, या नोटिफिकेशनमधील तारखांनुसार परीक्षा होतील. नागरी सेवा (मुख्य) परीक्षा, २०२१ या ७,८,९ आणि १६ जानेवारी २०२२ घेण्यात येणार आहेत. भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा, 2021 ही २७ फेब्रुवारी २०२१ रोजी सुरू होणार आहे आणि ८ मार्च २०२२ पर्यंत सुरू राहणार आहेत.'
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3CM95nG
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments