Also visit www.atgnews.com
ICSI CS Result 2021: 'असा' तपासा सीएस फाऊंडेशन परीक्षेचा निकाल
CS : इंस्टीट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) जून २०२१ साठी सीएस फाउंडेशन, एग्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल परीक्षेचा निकाल() जाहीर जाहीर केला जाणार आहे. या परीक्षेत सहभागी झालेले उमेदवार लवकरच आयसीएसआय (ICSI) ची अधिकृत वेबसाइट icsi.edu वर जाऊन आपला निकाल तपासू शकतात. ICSI ने नुकतीच आपल्या ट्विटर अकाऊंटवर यासंदर्भात सूचना दिली आहे. आयसीएसआय सीएस परीक्षा १३ ऑगस्ट आणि १४ ऑगस्ट रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांमध्ये आयोजित करण्यात आली होती. Result 2021: असा तपासा निकाल निकाल तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइट icsi.edu वर जा. होमपेजवर सीएस फाउंडेशन एग्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल एग्झाम रिझल्ट २०२१ ची अॅक्टिव्ह लिंक दिसेल रिझल्ट लिकंवर क्लिक केल्यानंतर नवीन पेज खुले होईल येथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅप्चा कोड एन्टर करु सबमिट बटणावर क्लिक करा तुमचा रिझल्ट स्क्रीनवर दिसेल रिझल्ट डाऊनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट घ्या ही परीक्षा १३ आणि १४ ऑगस्ट २०२१ रोजी आयोजित करण्यात आली होती. अधिसूचनेनुसार, उमेदवारांना कुठूनही रिमोट प्रॉक्टेड मोडद्वारे परीक्षा देण्याची अनुमती देण्यात आली होती. म्हणजेच ते घरून किंवा जवळच्या कोणत्याही सुविधा असलेल्या ठिकाणाहून परीक्षा देऊ शकले.परीक्षेच्या दरम्यान कोणतीही समस्या उद्भवू नये म्हणून चांगला इंटरनेट स्पीड असणारा लॅपटॉप किंवा डेस्कटॉपचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yhc2Jn
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments