स्पर्धा परीक्षेसाठी 'सारथी'मार्फत प्रशिक्षण

म. टा. प्रतिनिधी, पुणे मराठा व कुणबी विद्यार्थ्यांनी 'सारथी'मार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्यसेवा अराजपत्रित संयुक्त (गट-ब) पदांच्या स्पर्धा परीक्षेसाठी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेचे () व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी केले आहे. 'सारथी'ने उपलब्ध करून दिलेल्या निःशुल्क प्रशिक्षणाच्या सुवर्णसंधीचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन यश प्राप्त करावे. प्रशिक्षणासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १३ ऑगस्ट २०२१ आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी https://ift.tt/37oFpPc या वेबसाइटला भेट द्यावी. 'सारथी'मार्फत मराठा, कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी (अराजपत्रित) गट-ब (पीएसआय-एसटीआय-एएसओ) पदांसाठी ऑनलाइन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. त्यासंबंधीची जाहिरात सारथी वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली असून, विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. राज्यातील अनेक होतकरू विद्यार्थी राज्यसेवेत आपले भविष्य घडविण्याचे स्वप्न पाहतात. मात्र, अनेक वेळा आर्थिक पाठबळ व कोचिंगअभावी होतकरू व हुशार विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या रिंगणातून बाहेर पडतात. ग्रामीण भागातील विद्यार्थी अनेकदा आर्थिक विवंचनेमुळे शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत. त्यामुळे दुर्लक्षित गटातील विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्यसेवा क्षेत्रात सक्षम व उच्चशिक्षित अधिकारी घडविण्यासाठी 'सारथी'मार्फत एमपीएससी (अराजपत्रित गट-ब) व (पीएसआय-एसटीआय-एएसओ) ऑनलाइन आयोजित केले आहे. 'सारथी'मार्फत मागविले अर्ज 'स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी 'सारथी'मार्फत अर्ज मागविण्यात आले असून, यासाठी विद्यार्थी कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शकांकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड कागदपत्रे पडताळणीद्वारे करण्यात येईल,' असे अशोक काकडे यांनी सांगितले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lyltBr
via IFTTT

Post a Comment

0 Comments