पुणे विद्यापीठाच्या पीएचडी अर्जांसाठी रविवारपर्यंत मुदत

नाशिक : सावित्रीबाई फुले विद्यापीठामार्फत () पीएचडी प्रवेश परीक्षेसाठी (PET) अर्ज करण्यास रविवारपर्यंत (दि. ८) मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार असून, अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पीएचडी प्रवेशांसाठी प्रवेश परीक्षा (पीईटी) द्यावी लागणार आहे. विद्यापीठामार्फत वेबसाइटवर पीएचडीसाठी उपलब्ध जागा, गाईड, विद्याशाखा यांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. कायदा, व्यवस्थापन, वाणिज्य, भाषाशास्त्र, विज्ञानाच्या सर्व शाखा, तंत्रज्ञान, परकीय भाषा, अभियांत्रिकी, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, आर्किटेक्चर तसेच लाइफ सायन्स या विषयांच्या माहितीचा यामध्ये समावेश आहे. अर्ज दाखल केल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा होणार असून, गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती होणार असून, त्यानंतर अंतिम निवड केली जाणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी पीएचडीच्या जागांमध्ये वाढ केली नव्हती. परंतु, यंदा मात्र या जागांमध्ये वाढ करण्यात आली आहे. तसेच मार्गदर्शकांकडे उपलब्ध असलेल्या जागांचा आढावाही घेण्यात आला आहे. वाढलेल्या जागांमुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी प्रवेश घेता येणार आहे. जागांमध्ये वाढ यंदा 'पीएचडी'च्या जागांमध्ये वाढ झाल्याची माहिती विद्यापीठातील सूत्रांनी दिली. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील ६५ वेगवेगळ्या विद्याशाखा आणि विषयांमध्ये एकूण १ हजार ३७९ जागा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच विद्यापीठाच्या अंतर्गत एकूण १४०० जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lzBirO
via IFTTT

Post a Comment

0 Comments