राज्याच्या कांदळवन विभागात विविध पदांची भरती, ५० हजारपर्यंत मिळेल पगार

Mangroves Foundation : महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाच्या अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. कांदळवन विभागाअंतर्गत (Mangroves Foundation) सहायक संचालक अॅडमिनिस्ट्रेशन (Assistant Director - Administration) , सहाय्यक संचालक फायनान्स (Assistant Director - Finance), सहाय्यक संचालक लाइव्हलीहूड डिपार्टमेंट (Assistant Director – Livelihood Development), रिसर्च ऑफिसर (Research Officer) या पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. मॅन्ग्रोव्ह अॅण्ड मरीन बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन फाऊंडेशन महाराष्ट्र (Mangrove Foundation) अंतर्गत मुंबईत १ वर्षाच्या कालावधीसाठी चार पदांवर भरती होणार आहे. उमेदवाराची गुणवत्ता पाहून हा कालावधी वाढवला जाऊ शकतो. सहायक संचालक अॅडमिनिस्ट्रेशन (Assistant Director - Administration) या पदासाठी उमेदवाराकडे एचआरमध्ये एमबीए किंवा अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन असणे गरजेचे आहे. एचआर किंवा संबंधित या क्षेत्राचा किमान ३ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. या पदासाठी ५० हजार रुपये दरमहा पगार मिळणार आहे. सहाय्यक संचालक फायनान्स (Assistant Director - Finance)या पदासाठी उमेदवाराकडे सीए/ सीए (इंटर)/ ३ वर्षांच्या CA अनुभवासोबत एमकॉम/ सीए (इंटर) आणि ५ वर्षांचा एमकॉम ही शैक्षणिक पात्रता असणे गरजेचे आहे. या पदासाठी पात्र उमेदवारास ५० हजार दरमहा पगार मिळणार आहे. सहाय्यक संचालक लाइव्हलीहूड डिपार्टमेंट (Assistant Director – Livelihood Development) पदासाठी इच्छुक उमेदवाराकडे फिशरीस आणि अॅक्वाकल्चर संबधी क्षेत्रामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन, मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेची समज आणि संवाद साधता येणं तसेच संबंधित क्षेत्राचा ३ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास ५० हजार रुपये पगार मिळणार आहे. रिसर्च ऑफिसर (Research Officer)पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराकडे बायोलॉजिकल सायन्समध्ये किमान ६० टक्के गुणासह पोस्ट ग्रॅज्युएशन, बायोलॉजिकल क्षेत्राचा २ वर्षांचा अनुभव, इंग्रजी, मराठी भाषा लिहिता-वाचता येणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला ३५ हजार रुपये दरमहा पगार देण्यात येणार आहे. उमेदवारांनी आपले अर्ज hr.mangrovefn@gmail.com वर दिनांक १५ सप्टेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने पाठवायचे आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइट https://ift.tt/2WmuPq1 वर यासंदर्भात अधिक माहिती मिळणार आहे. भरती संदर्भातील अधिक तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2UXChHq
via IFTTT

Post a Comment

0 Comments