IIT JAM 2022: अर्ज प्रक्रियेला सुरुवात, ११ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन नोंदणी

IIT JAM 2022: भारतीय तंत्रज्ञान संस्था, रुडकी (IIT रुडकी) द्वारे मास्टर्स (JAM 2022) साठी संयुक्त प्रवेश परीक्षेसाठी (Joint Entrance Exam, JAM 2022) अर्ज प्रक्रिया २५ ऑगस्ट २०२१ पासून सुरू झाली आहे. ऑनलाइन अर्ज फॉर्म अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ११ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन नोंदणी करू शकतात. यासाठी उमेदवारांना jam.iitr.ac.in ला भेट द्यावी लागेल. महत्वाच्या तारखा पुढीलप्रमाणे - ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख: २५ ऑगस्ट २०२१ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ११ ऑक्टोबर, २०२१ प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख: ४ जानेवारी, २०२२ परीक्षेची तारीख: १३ फेब्रुवारी २०२२ निकाल घोषित करण्याची तारीख: २२ मार्च, २०२२ अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जावे आणि पात्रतेचे निकष पूर्णपणे तपासून घ्यावेत. वेबसाईटवर उपलब्ध माहिती ब्रोशरमध्ये सविस्तर माहिती दिली आहे. या परीक्षेद्वारे, देशभरातील आयआयटींमधील दोन वर्षीय एमएससी, जॉइंट एमएससी-पीएचडी, एमएससी-पीएचडी ड्युअल डिग्री आणि अन्य मास्टर्स कोर्ससह इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरूच्या इंटिग्रेटेड पीएचडी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश दिला जातो. संयुक्त प्रवेश परीक्षा ही अखिल भारतीय स्तरावरील परीक्षा आहे. नोंदणी शुल्क सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना ऑनलाईन नोंदणी शुल्क एका पेपरसाठी १५०० रुपये आणि दोन पेपरसाठी २१०० रुपये भरावे लागेल. त्याच वेळी, सर्व महिला उमेदवार / एससी / एसटी / पीडब्ल्यूडी उमेदवारांना एका टेस्ट पेपरसाठी ७५० रुपये आणि दोन टेस्ट पेपरसाठी १,०५० रुपये शुल्क भरावे लागेल. अर्ज शुल्काच्या तपशीलासाठी, अधिकृत वेबसाइटला भेट देता येईल. अर्ज कसा कराल? ऑनलाईन अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट, jam.iitr.ac.in ला भेट द्या. पुढे, JAM 2022 वर क्लिक करा. होमपेजवर उपलब्ध ऑनलाइन लिंकवर क्लिक करा. आता एक नवीन टॅब उघडेल. येथे उपलब्ध दुव्याद्वारे तुम्ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकाल. त्यानंतर, पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या नावनोंदणी आयडी / ईमेल आयडी आणि पासवर्ड द्वारे लॉग इन करू शकता. joaps.iitr.ac.in या थेट दुव्याद्वारे उमेदवार सहज अर्ज करू शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2WsEefu
via IFTTT

Post a Comment

0 Comments